________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीयोगवासिष्ठसुभाषितानि
२३ अनित्यं यौवनं बाल्यं शरीरं द्रव्यसंचयाः।
भावाद्भावान्तरं यान्ति तरङ्गवदनारतम् ॥ १।२८।१० बाल्य, तारुण्य, शरीर, द्रव्यसंचय इत्यादि सर्व वस्तू अनित्य असून समुद्रावरील लाटांप्रमाणे त्यांची रूपें एकसारखी पालटत असतात. २४ अनुद्वेगः श्रियो मूलम् ॥ ३॥११२२
उद्विग्न न होणे हे संपत्तीचें मूळ होय. २५ अनुरक्ताङ्गनालोललोचनालोकिताकृति ।
स्वस्थीकर्तुं मनः शक्तो न विवेको महानपि ॥१॥२६॥३८ अनुरक्त असलेल्या तरुणीने चंचल नेत्रकटाक्ष फेकले असतां मोठा विवेकी मनुष्य असला तरी, तो आपले मन आवरण्याला समर्थ होत नाही. २६ अनेकजन्मनामन्ते विवेकी जायते पुमान् ॥ ६।१२६४
अनेक जन्मांचा अनुभव घेऊन पुरुष विवेकी होतो. २७ अन्तकः पर्यवस्थाता जीविते महतामपि ।
चलन्त्यायूंषि शाखाग्रलम्बाम्बूनीव देहिनाम् ॥७।९३३८५ मोठमोठ्यांच्या जीवितालाही ग्रासण्यासाठी यम त्यांच्याभोंवतीं घिरट्या घालीत असतो. प्राण्यांचे आयुष्य शाखाग्रावर लोंबणान्या जलबिंदूइतकेंच स्थिर आहे ! २८ अन्तर्नैराश्यमादाय बहिराशोन्मुखेहितः।
बहिस्तप्तोऽन्तरा शीतो लोके विहर राघव ॥ ५।१८।२१ (श्रीवसिष्ठ म्हणतात) हे राघवा, आंतून निराश राहा, पण बाहेरून आशावान असल्यासारखा उद्योग कर. तसेंच धनादिकांचा नाश झाला असतां आंतून शांत रहा, पण बाह्यतः संतप्त असल्याप्रमाणे वर्तन ठेव.
For Private And Personal Use Only