________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४२७ वहन्ति वर्षन्ति नदन्ति भान्ति
ध्यायन्ति नृत्यन्ति समाश्वसन्ति । नद्यो घना मत्तगजा वनान्ताः
प्रियाविहीनाः शिखिनः प्लवङ्गमाः ॥४।२८।२७ (माल्यवान् पर्वतावर राहत असतां राम लक्ष्मणाजवळ वर्षाकालाचे वर्णन करितो.) सांप्रतकाळी नद्या वाहूं लागल्या आहेत, मेघांनी वर्षाव सुरू केला आहे, मदोन्मत्त हत्ती गर्जना करीत आहेत, वनप्रदेशामध्ये शोभा येत चालली आहे, प्रिय स्त्रियांचा वियोग झालेले पति स्त्रियांचे ध्यान करीत आहेत, मोर नृत्य करूं लागले आहेत आणि ( सुग्रीवाला राज्य प्राप्त झाल्यामुळे) वानरांनाही धीर येऊ लागला आहे. (या श्लोकांतील पहिल्या दोन चरणांमध्ये क्रियापदें आली असून शेवटच्या दोन चरणांमध्ये त्या क्रियापदांचे कर्ते क्रमाने दिले आहेत.) ४२८ वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित ।
नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नावाच्यं विद्यते क्वचित्॥५।५५।५ अतिशय क्रुद्ध झालेला मनुष्य बोलावे काय, आणि बोलू नये काय, हे जाणत नाही. क्रुद्ध मनुष्याला अकार्य असे काही नाही, आणि अवाच्य असेंही काही नाही. ४२९ वामः कामो मनुष्याणां यस्मिन्किल निबध्यते ।
जने तस्मिस्त्वनुक्रोशः स्नेहश्च किल जायते ॥ ५।२२।४ (रावण सीतेला म्हणतो.) हा मनुष्यांचा काम दुष्ट आहे. रागावण्यास योग्य अशा मनुष्याचे ठिकाणी हा जडला, तर त्याविषयीं सुद्धां मनुष्याचे मनांत स्नेह व दया ही उत्पन्न होतात.
For Private And Personal Use Only