SearchBrowseAboutContactDonate
Page Preview
Page 286
Loading...
Download File
Download File
Page Text
________________ Shri Mahavir Jain Aradhana Kendra www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir ८८ सार्थश्रीरामायणसुभाषितानि ४२१ लक्ष्मीश्चन्द्रादपेयाद्वा हिमवान्वा हिमं त्यजेत् । अतीयात्सागरो वेलां न प्रतिज्ञामहं पितुः ॥ २।११२।१८ ( राम भरताला म्हणतो.) फारतर काय, कांति चंद्राला सोडून जाईल, हिमालयपर्वतावरीलही बर्फ नाहींसें होईल व समुद्रही मर्यादेचे उल्लंघन करील, परंतु मी आपल्या पित्याच्या प्रतिज्ञेचा त्याग करणार नाहीं. ४२२ लोकप्रवादः सत्योऽयं पण्डितैः समुदाहृतः । अकाले दुर्लभो मृत्युः स्त्रिया वा पुरुषस्य वा || ५ | २५ | १२ ( सीता म्हणते. ) स्त्रीला काय किंवा पुरुषाला काय, अकालीं मृत्यु येणें दुर्लभ होय, ही विद्वानांच्या तोंडची म्हण सत्य आहे. ४२३ वक्तव्यतां च राजानो वने राज्ये व्रजन्ति च ॥७|४३|६ ( राम म्हणतो. ) राजे वनामध्यें असोत अथवा राज्यावर असोत; लोक त्यांना कांहींना कांहीं तरी नांवें ठेवीतच असतात. ४२४ वयस्यस्योपकर्तव्यं धर्ममेवानुपश्यता || ४|१८ २९ धर्माकडे दृष्टि देऊन वागणाऱ्यानें मित्रावर उपकार केलाच पाहिजे. ४२५ वर्जयेद्वज्रमुत्सृष्टं वर्जयेदन्तकश्चिरम् । त्वद्विधं नतु संक्रुद्धो लोकनाथः स राघवः || ५ | २१।२३ ( सीता रावणाला म्हणते.) इंद्राच्या हातून सुटलेलें वज्र अथवा प्रत्यक्ष मृत्युही पुष्कळ दिवसपर्यंत कदाचित् तुझी उपेक्षा करील. परंतु क्रुद्ध झालेला लोकनाथ राम तुझ्यासारख्याचा प्राणघात केल्याशिवाय रहाणार नाहीं. ४२६ वसेत्सह सपत्नेन क्रुद्धेनाशीविषेण च । न तु मित्रप्रवादेन संवसेच्छत्रुसेविना ।। ६ । १६।२ ( रावण बिभीषणाला म्हणतो. ) शत्रूशीं सहवास करावा. क्रुद्ध झालेल्या सर्पाबरोबरही रहावें; परंतु मित्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि शत्रूची शुश्रूषा करणाऱ्या पुरुषाबरोबर कधीं वास्तव्य करूं नये. For Private And Personal Use Only
SR No.020660
Book TitleSarth Mahabharat Subhashitani
Original Sutra AuthorN/A
AuthorVishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
PublisherKeshav Bhikhaji Dhavle
Publication Year1930
Total Pages463
LanguageSanskrit
ClassificationBook_Devnagari
File Size14 MB
Copyright © Jain Education International. All rights reserved. | Privacy Policy