________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
४१८ राज्यं भ्रष्टं वनेवासः सीता नष्टा मृतो द्विजः ।
ईदृशीयं ममालक्ष्मीर्दहेदपि हि पावकम् ॥ ३॥६७।२४ संपूर्णमपि चेदद्य प्रतरेयं महोदधिम् । सोऽपि नूनं ममालक्ष्म्या विशुष्येत्सरितांपतिः ३०६७२५ (जटायु पक्षी मूञ्छित झालेला पाहून राम म्हणतो.) राज्य नाहींसें झालें, वनामध्ये वास्तव्य करण्याचा प्रसंग आला, सीतेचा ठिकाण नाही, आणि (कैवारी जटायु) पक्षीही मरून गेला; अशा प्रकारची ही माझी आपत्ति अग्नीलाही जाळून टाकील. हा दुःखसंताप शमन होण्याकरितां संपूर्ण महासागरामध्ये जर मी आज उडी घातली, तर तो नद्यांचा अधिपति असलेला सागरही माझ्या आगीमुळे खरोखर शुष्क होऊन जाईल. ४१९ रामं दशरथं विद्धि मां विद्धि जनकात्मजाम् ।
अयोध्यामटवीं विद्धि गच्छ तात यथासुखम्॥२।४०९ (सुमित्रा लक्ष्मणाला म्हणते.) बाबा, तूं रामाचे ठिकाणी दशरथ राजाची भावना कर, जनकात्मजा सीता मी आहे, असे समज. आणि अरण्य म्हणजे अयोध्या, असे समजून वनाला सुखाने जा. ४२० रामो भामिनि लोकस्य चातुर्वर्ण्यस्य रक्षिता ।
मर्यादानांच लोकस्य कर्ता कारयिता च सः॥५॥३५।११ (मारुति लंकेमध्ये सीतेच्यापुढे रामाचे गुण वर्णन करितो. ) बाई सीते, राम हा चातुर्वर्ण्याचा रक्षणकर्ता असून लोकांना धर्ममर्यादा घालून देणारा व त्याप्रमाणे लोकांना वागविणाराही
आहे.
For Private And Personal Use Only