________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि २१२ न तत्समाचरेद्धीरो यत्परोऽस्य विगर्हयेत् । _यथात्मनस्तथान्येषां दारा रक्ष्या विमर्शनात्॥३॥५०८
(जटायु रावणाला म्हणतो) दुसरा ज्याला नांव ठेवील तें कर्म विचारी पुरुषाने कधीही करू नये. आपल्या स्त्रीप्रमाणेच परस्त्रीचेही परपुरुषाच्या स्पर्शापासून रक्षण केले पाहिजे.. २१३ न तं पश्याम्यहं लोके परोक्षमपि यो नरः।
स्वमित्रोऽपि निरस्तोऽपि योऽस्य दोषमुदाहरेत्।।२।२१।५ (लक्ष्मण कौसल्येला म्हणतो) अपमान करून सोडलेला हाडवैरी जरी झाला, तरी रामाच्या मागेंसुद्धा त्याचा दोष काढणारा पुरुष या जगतामध्ये कोणी असेलसा मला दिसत नाही. २१४ न तु सद्योऽविनीतस्य दृश्यते कर्मणः फलम् ।
कालोऽप्यङ्गीभवत्यत्र सस्यानामिव पक्तये ॥३१४९।२७. बेफामपणे केलेल्या कृत्याचें फळ ताबडतोब दृष्टीस पडत नाही. कारण धान्ये परिपक्व होण्यास ज्याप्रमाणे कालाची अपेक्षा आहे.. त्याप्रमाणे कर्माचे फल प्राप्त होण्यास कालाची अपेक्षा आहे. २१५ न ते मनुष्या देवास्ते ये चारु शुभकुण्डलम् ।
मुखं द्रक्ष्यन्ति रामस्य वर्षे पञ्चदशे पुनः॥ २॥६४।६८ ( मरणोन्मुख दशरथराजा म्हणतो) रामचंद्राचे सुंदर कुंडलमंडित मनोहर मुख पंधराव्या वर्षी जे पुनः पाहातील, ते मनुष्य नव्हेत,. तर साक्षात् देव होत. २१६ न त्वां पश्यामि कौसल्ये साधु मां पाणिना स्पृश ।
रामं मेऽनुगता दृष्टिरद्यापि न निवर्तते ॥ २॥४२॥३४ ( राम वनवासाला गेल्यामुळे दुःखी झालेला दशरथराजा मध्यरात्री कौसल्येला म्हणतो.) हे कौसल्ये, तूं मला दिसत नाहीस. तूं मला आपल्या हस्ताने स्पर्श कर बरें! माझी दृष्टि रामाच्या बरोबर गेली आहे, ती त्यापासून निवृत्त होत नाही.
For Private And Personal Use Only