________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२०८ न चातिप्रणयः कार्यः कर्तव्योप्रणयश्च ते ।
उभयं हि महादोषं तस्मादन्तरदृग्भव ॥ ४।२२।२३ (सुग्रीवाबरोबर कसे वागावें याविषयी मरणोन्मुख वाली आपल्या अंगद पुत्राला उपदेश करतो. ) सुग्रीवाशी तूं अति लगटपणाही करूं नकोस, व तुटकपणानेही वागू नकोस; कारण ही दोन्ही मोठी अनर्थावह आहेत. म्हणून तूं मध्यम मार्गाकडे लक्ष देऊन वागत जा. २०९ न चिरं पापकर्माणः क्रूरा लोकजुगुप्सिताः ।
ऐश्वर्य प्राप्य तिष्ठन्ति शीर्णमूला इव माः ॥३।२९।७ ज्यांची मुळे छिन्न झाली आहेत, असे वृक्ष वांचत नाहीत; त्याप्रमाणे जे क्रूर असून पापकर्मे करणारे असतात, व तेणेकरून लोकनिंदेस पात्र झालेले असतात, त्यांस ऐश्वर्य प्राप्त झाले, तरी त्याचा ते चिरकाल उपभोग घेऊ शकत नाहीत. २१० न चिरात्प्राप्यते लोके पापानां कर्मणां फलम् ।
सविषाणामिवान्नानां भुक्तानां क्षणदाचर ॥ ३।२९।९ (राम खर राक्षसाला म्हणतो) हे निशाचरा, भक्षण केलेल्या सविष अन्नाचे फल प्राप्त होण्यास जसा फार वेळ लागत नाही, तसा जगामध्ये पापकर्माचे फळ प्राप्त होण्यास फार वेळ लागत नाही. २११ न तत्कुर्यादसिस्तीक्ष्णः सर्पो वा व्याहतः पदा।
अरिवो नित्यसंक्रुद्धो यथात्मा दुरनुष्ठितः।।७५९प्र.२।२५ कुमार्गाला लागलेलें मन ज्याप्रमाणे घात करते, त्याप्रमाणे तीक्ष्ण खड्ग, शेपटीवर पाय दिलेला सर्प किंवा नेहमों क्रुद्ध असलेला शत्रुदेखील घात करीत नाही.
For Private And Personal Use Only