________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
४६
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२१७ न त्वेवानागते काले देहाच्यवति जीवितम् ।।२।३९।५
काल प्राप्त झाल्याशिवाय देहापासून जीवित नष्ट होत नाही. २१८ न दूतवध्यां प्रवदन्ति सन्तो
दूतस्य दृष्टा बहवो हि दण्डाः ॥ ५।५२।१४।। दूताचा वध करण्यास सज्जनांनी सांगितले नाही. दूताला इतर दंड सांगितले आहेत. २१९ न देशकालौ हि यथार्थधर्मा
ववेक्षते कामरतिर्मनुष्यः ॥ ४।३३।५५ कामासक्त झालेल्या मनुष्याला देशकालांचे भान राहात नाहीं आणि तो धर्म व अर्थ या पुरुषार्थाचीही पर्वा करीत नाही. २२० न नूनं चात्मनः श्रेयः पथ्यं वा समवेक्षसे । __ मृत्युकाले यथा मर्यो विपरीतानि सेवते ॥ ३॥५३॥१७ (सीता रावणाला म्हणते ) स्वतःला कोणती गोष्ट तात्काल किंवा परिणामी सुखावह होणारी आहे, याचा विचार तूं खरोखर मुळींच करीत नाहीस. मृत्यु समीप आलेला मनुष्य ज्याप्रमाणे विपरीत कृत्यांचे अवलंबन करूं लागतो, त्याप्रमाणे तूं करीत आहेस. २२१ नन्दन्त्युदित आदित्ये नन्दन्त्यस्तमितेऽहनि । ___ आत्मनो नावबुध्यन्ते मनुष्या जीवितक्षयम्॥२।१०५।२४
सूर्योदय झाला असतां मनुष्ये आनंदित असतात, आणि दिवस अस्ताला गेला असतांही आनंदीच असतात. परंतु आपल्या जीविताचा क्षय होत आहे, हे त्यांना समजत नाही.
For Private And Personal Use Only