________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२५
१२१ कृत्स्नाद्भयाज्ज्ञातिभयं सुकष्टं विदितं च नः ॥ ६।१६/८
( रावण विभीषणाला म्हणतो.) कोणत्याही भयापेक्षां भाऊबंदांचें भय फारच कठीण, हैं आम्हांला समजून चुकलें आहे. १२२ कैकेय मामकाङ्गानि मा स्प्राक्षीः पापनिश्चये ।
नहि त्वां द्रष्टुमिच्छामि न भार्या नच बान्धवी ॥। २।४२।६
( राम वनांत निघून गेल्यावर दशरथ कैकेयीला म्हणतो) हे कैकेय, तूं माझ्या अवयवांना स्पर्श करूं नको. हे पापनिश्चये, मला तुझें तोंड पाहण्याची इच्छा नाहीं. तूं माझी भार्या नव्हेस इतकेंच नव्हे परंतु (लांबची कोणी ) नातेवाईक सुद्धां नव्हेस. १२३ कोपं न गच्छन्ति हि सत्त्ववन्तः || ५/५२।१६ सत्त्वशील मनुष्य कधींही कोपवश होत नाहींत. १२४ क्रुद्धः पापं न कुर्यात्कः क्रुद्धो हन्याद्गुरूनपि ।
क्रुद्धः परुषया वाचा नरः साधूनधिक्षिपेत् ।। ५/५५/४ क्रुद्ध झाला असतां कोण बरें पाप करणार नाहीं ? क्रुद्ध पुरुष गुरूचाही वध करलि. क्रुद्ध मनुष्य आपल्या कठोर भाषणानें साधूंनाही टाकून बोलेल.
१२५ क्रोधः प्राणहरः शत्रुः क्रोधो मित्रमुखो रिपुः । क्रोधो ह्यसिर्महातीक्ष्णः
सर्व क्रोधोऽपकर्षति || ७|५९ प्र. २।२१
क्रोध हा प्राणहरणकर्ता शत्रु होय. क्रोध हा मित्रमुख शत्रु ( हितशत्रु) आहे. क्रोध अत्यंत तीक्ष्ण असा खड्ग आहे. क्रोध हा सर्वनाशक आहे.
For Private And Personal Use Only