________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
११६ कुलीनमकुलीनं वा
वीरं पुरुषमानिनम् । चारित्रमेव व्याख्याति
शुचिं वा यदि वाशुचिम् ॥ २।१०९।४ पुरुष चांगल्या कुळांतील आहे किंवा वाईट कुळांतील आहे, वीर आहे किंवा अधीर आहे आणि पवित्र आहे की अपवित्र आहे, हे सर्व त्याच्या वर्तनावरून समजून येते. ११७ कृतकृत्या हि वैदेही छायेवानुगता पतिम् ।
न जहाति रता धर्मे मेरुमर्कप्रभा यथा ॥ २४०।२४ छायेप्रमाणे पतीला अनुसरणारी सीता खरोखर धन्य आहे. कारण, सूर्याची प्रभा ज्याप्रमाणे मेरुपर्वताला सोडीत नाही, त्याप्रमाणे धर्माचे ठिकाणी रत असलेली ही सीता आपल्या पतीला सोडून रहात नाही. ११८ कृतं न प्रतिकुर्याद्यः पुरुषाणां हि दूषकः ॥ ४॥३८।२६
पुरुषांमध्ये तोच धर्मनाशक होय की, जो केलेल्या उपकाराची फेड प्रत्युपकाराने करीत नाही. ११९ कृतार्था ह्यकृतार्थानां मित्राणां न भवन्ति ये ।
तान्मृतानपि क्रव्यादाः कृतघ्नानोपभुञ्जते ॥४॥३०१७३ " जे स्वतः कृतार्थ होऊन कृतकार्य न झालेल्या आपल्या मित्रांच्या उपयोगी पडत नाहीत, त्या कृतघ्नांस मेल्यावर श्वानादि मांसभक्षक पशुसुद्धां भक्षण करीत नाहीत. १२० कृते च प्रतिकर्तव्यमेष धर्मः सनातनः ॥५।१।१०६ उपकाराची प्रत्युपकाराने फेड करावी, हा सनातन धर्म होय.
For Private And Personal Use Only