________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
२३
rrrrrrrrn.nanewranamamannaman
१०९ कायेन कुरुते पापं मनसा संप्रधार्य तत् ।
अनृतं जिह्वया चाह त्रिविधं कर्म पातकम् ॥२।१०९।२१ मनुष्य प्रथमतः अंत:करणांत पापकर्माचा निश्चय करितो, नंतर त्या पापाचा जिव्हेने उच्चार करितो, व तदनंतर देहाने त्याचें आचरण करितो, असें तीन प्रकारचे पापकर्म आहे. ११० कार्याणां कर्मणा पारं ।
यो गच्छति स बुद्धिमान् ॥६८८।१४ जो कृति करून कार्याच्या पार जातो, तो बुद्धिमान होय. १११ कार्यार्थिनां विमर्दो हि राज्ञांदोषाय कल्पते।।७५३।२४
कार्यार्थी लोकांचा कलह म्हटला म्हणजे राजांना दोषास्पद होतो. ११२ कार्ये कर्मणि निवृत्ते यो बहून्यपि साधयेत् ।
पूर्वकार्याविरोधेन स कार्य कर्तुमर्हति ॥५॥४१॥५ मुख्य कार्य सिद्धीला गेले असता, त्या पूर्वकार्यास विरोध न येईल, अशा रीतीने दुसरीही बहुत कार्ये जो करितो, तोच कार्य करण्याविषयी योग्य होतो. ११३ कालो हि दुरतिक्रमः॥ ३१६८।२१
कालाचें अतिक्रमण करणे ही गोष्ट दुःसाध्य आहे. ११४ किं त्वामन्यत वैदेहः पिता मे मिथिलाधिपः ।
राम जामातरं प्राप्य स्त्रियं पुरुषविग्रहम् ॥ २॥३०॥३ ( वनवासाला येण्यासंबंधाने अनुमति मिळावी म्हणून सीता रामाला म्हणते) हे रामा, माझा पिता मिथिलापति जनक यास, आकृतीने मात्र पुरुष, परंतु वस्तुतः स्त्री अशा तुम्हां जांवयाची प्राप्ति होऊन काय बरे वाटले असेल ? ११५ कीत्यर्थे तु समारम्भः सर्वेषां सुमहात्मनाम् ॥७॥४५।१३ सर्वमहात्मे कीर्ति संपादन करण्याकरितांच खटपट करीत असतात.
For Private And Personal Use Only