________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२६
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
१२६ क्षत्रियाणां तु वीराणां वनेषु नियतात्मनाम् ।
धनुषा कार्यमेतावदार्तानामभिरक्षणम् ॥ ३।९।२६ क्षत्रिय वीरांचा धर्म म्हटला म्हणजे, वनांत राहून मनोनिग्रह करणान्या पीडित जनांचे धनुष्याच्या साह्याने रक्षण करणे, हा होय. १२७ क्षत्रियाणामिह धनुर्हताशस्येन्धनानि च ।
समीपतः स्थितं तेजो बलमुच्छ्यते भृशम् ॥३९।१५ अग्नीचें तेज काष्ठाचे योगाने या लोकी जसें वृद्धिंगत होते, त्याप्रमाणे क्षत्रियांजवळ असलेले धनुष्य, त्यांच्या तेजोबलाची वृद्धि करिते. १२८ क्षत्रियैर्धार्यते चापो नातशब्दो भवेदिति ॥ ३३१०१३
( रक्षण होत नसल्यामुळे ) पीडित होऊन लोकांना रडत बसण्याची पाळी येऊ नये, एवढ्याचकरितां क्षत्रियांनी धनुष्य धारण करावयाचे असते. १२९ क्षत्रियो निहतःसंख्ये न शोच्य इति निश्चयः६१०९।१९
क्षत्रिय रणांगणावर पडला असता, त्याबद्दल शोक करूं नये, ही निश्चित गोष्ट आहे. १३० क्षमया हि समायुक्तं मामयं मकरालयः।
असमर्थ विजानाति धिक् क्षमामीदृशे जने ॥६।२१।२० (समुद्राने दर्शन दिले नाही तेव्हां राम लक्ष्मणाला म्हणतो) मी क्षमेचे अवलंबन केले असल्यामुळे हा समुद्र मला अशक्त समजत आहे. म्हणून अशा पुरुषाचे ठिकाणी दर्शविलेल्या क्षमेला धिक्कार. असो.
For Private And Personal Use Only