________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
७१ उत्तरं नोत्सहे वक्तुं दैवतं भवती मम ।
वाक्यमप्रतिरूपं तु न चित्रं स्त्रीषु मैथिलि ॥३॥४५।२९ (लक्ष्मण म्हणतो) हे सीते, तूं माझें दैवत असल्यामुळे माझ्याने तुला उत्तर देववत नाही. स्त्रियांनी अनुचित भाषण करणे, ह्यांत कांहीं आश्चर्य नाही. (हे साहजिक आहे.) ७२ उत्साहवन्तः पुरुषा नावसीदन्ति कर्मसु ॥४।१।१२३ उत्साही पुरुष कोणत्याही कार्यात खचून जात नाहीत. ७३ उत्साहो बलवानार्य नास्त्युत्साहात्परं बलम् । __ सोत्साहस्य हि लोकेषु न किंचिदपि दुर्लभम् ।।४।१।१२२
(लक्ष्मण रामाला म्हणतो) हे आर्या, उत्साह हा (अत्यंत) बलवान आहे. उत्साहापेक्षा दुसरें श्रेष्ठ असें बल नाही. उत्साही पुरुषाला लोकांमध्ये दुर्लभ असें कांहींच नाही. ७४ उद्विजन्ते यथा सन्निरादनृतवादिनः ।
धर्मः सत्यपरो लोके मूलं सर्वस्य चोच्यते ॥२॥१०९।१२ सर्पापासून जशी लोकांना भीति असते, त्याचप्रमाणे असत्यवादी मनुष्यापासून लोकांना भीति असते. ज्यांत सत्य मुख्य आहे, असा जो धर्म, तोच लोकांत ( सर्व इष्टप्राप्तीचे ) मूळ आहे, असे सांगतात. ७५ उद्वेजनीयो भूतानां नृशंसः पापकर्मकृत् ।
त्रयाणामपि लोकानामीश्वरोऽपि न तिष्ठति ॥३।२९।३ जो प्राणिमात्राला उद्विग्न करितो, जो पापकर्मी व दुष्ट असतो तो तीनही लोकांचा प्रभु झाला, तरी फार कालपर्यंत टिकणार नाही. ७६ उपकारफलं मित्रमपकारोऽरिलक्षणम् ॥ ४८२१ उपकाररूप फल हे मित्रत्वाचे लक्षण व अपकार करणे हे शत्रुत्वाचे लक्षण होय.
For Private And Personal Use Only