________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि
६७ आस्फोटयामास चुचुम्ब पुच्छं
ननन्द चिक्रीड जगौ जगाम । स्तम्भानरोहन्निपपात भूमौ
निदर्शयन्स्वां प्रकृति कपीनाम् ॥ ५।१०५४ ('ही सीता असावी' असा तर्क झाल्यावर मारुतीला आनंद झाला त्याचे वर्णन ) वानरांना योग्य असा आपला जातिस्वभाव दर्शविण्यास उद्युक्त झालेला तो हनुमान् आपले पुच्छ आपटूं लागला, त्याचे चुंबन घेऊं लागला, मनामध्ये आनंदित होऊन क्रीडा करूं लागला, गाऊ लागला. इकडे तिकडे धावाधाव करूं लागला. आणि खांबावर चढ़न फिरून जमिनीवरही उड्या मारूं लागला. ६८ आहुः सत्यं हि परमं धर्म धर्मविदो जनाः॥ २॥१४॥३ 'सत्य हाच परम धर्म होय,' असें धर्मवेत्ते लोक म्हणतात. ६९ इदं शरीरं निःसंज्ञं बन्ध वा घातयस्व वा ।
नेदं शरीरं रक्ष्यं मे जीवितं वापि राक्षस ॥ ३५६।२१
न तु शक्यमपक्रोशं पृथिव्यां दातुमात्मनः॥३५६।२२ (सीता रावणाला म्हणते) हे राक्षसा, हे जड शरीर बांधून ठेव, अगर याचा घात कर. कारण माझी पृथ्वीवर (सीता गैर चालीची निघाली अशा प्रकारची ) निंदा होणार असेल तर शरीर काय, अथवा जीवित काय, यांचे रक्षण मला करावयाचें नाहीं. . ७० इदं तु मम दीनस्य मनो भूयः प्रकर्षति ।
यदिहास्य प्रियाख्यातुने कुर्मि सदृशं प्रियम् ॥६।१।१२ एष सवेस्वभूतस्तु परिष्वङ्गो हनूमतः।
मया कालमिमं प्राप्य दत्तस्तस्य महात्मनः ॥६।१।१३ (रामम्हणतो) सीतेचा शोध लागला ही प्रियवार्ता कथन करणाऱ्या ह्या वानराचें-मारुतीचें-त्याने केलेल्या कार्यानुरूप प्रिय मी करूं शकत नाही, त्यामुळे मज दीनाचें मन अत्यंत खिन्न होत आहे. अशा वेळी कडकडून भेट देणें हेंच काय ते माझ्यापाशी उरलें आहे आणि ही भेट मी त्या महात्म्या हनुमंताला देत आहे.
For Private And Personal Use Only