________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीरामायणसुभाषितानि mmmmmmmmmmmmm ७७ उपकारेण वीरस्तु प्रतिकारेण युज्यते । ___ अकृतज्ञोप्रतिकृतो हन्ति सत्त्ववतां मनः॥४।२७।४५
वीर पुरुषावर कोणीही उपकार केला असता, तो वीर पुरुष प्रत्युपकार करितोच. उपकार न जाणून प्रत्युपकार न करील, तर तो सत्त्वशील पुरुषांचा मनोभंग करितो. ७८ उपभुक्तं यथा वासः सजो वा मृदिता यथा ।
एवं राज्यात्परिभ्रष्टः समर्थोऽपि निरर्थकः ॥३॥३३॥१९ ज्याप्रमाणे वापरलेले वस्त्र अथवा चुरगळलेल्या माळा निरुपयोगी होतात, त्याचप्रमाणे राज्यापासून भ्रष्ट झालेला पुरुष समर्थ असूनही निरुपयोगी होतो. ७९ उपशान्तवणिक्पण्या नष्टहर्षा निराश्रया ।
अयोध्या नगरी चासीनष्टतारमिवाम्बरम् ॥ २॥४८॥३५ (राम वनवासाला गेल्यावर अयोध्येची स्थिति.) वाण्यांची दुकानें बंद झाली, हर्ष नाहीसा झाला, लोकांचा आश्रय तुटल्यासारखा झाला अशा प्रकारे ती अयोध्या नगरी नक्षत्रशून्य आकाशाप्रमाणे निस्तेज दिसू लागली.
८० उपायकुशलो ह्येव जयेच्छवूनतन्द्रितः ॥६।८।१२ ___ उपाययोजनेंत कुशल अशा मनुष्याने आळस टाकून शत्रूस जिंकावें. .८१ उभे सन्ध्ये शयानस्य यत्पापं परिकल्प्यते ।
तच पापं भवेत्तस्य यस्यार्योऽनुमते गतः ॥२७५१४४ (आपल्या निरापराधिपणाविषयी खात्री करून देणारा भरत कौसल्येला म्हणतो) ज्याची अनुमति मिळवून आर्य-श्रीरामचंद्रवनवासाला गेला, त्यास सकाळी व संध्याकाळी निद्रा करणाऱ्याला जें पाप लागते, ते लागावें.
रा. सु. २
For Private And Personal Use Only