________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
१५१
९४४ सत्यं स्वर्गस्य सोपानं पारावारस्य नौरिव ॥ ५।३३।४७
समुद्र तरून जाण्यास जशी नाव तसा सत्य, हा स्वर्गास जाण्याचा जिना आहे. ९४५ सत्यं दमस्तपो दानमहिंसा धर्मनित्यता ।
साधकानि सदा पुंसां न जातिन कुलं नृप ॥३॥१८११४३ (अजगर झालेला नहुषराजा युधिष्ठिराला म्हणतो) हे राजा, सत्यभाषण, इंद्रियनिग्रह, तप, दान, अहिंसा आणि नित्य धर्माचरण हीच नेहमी मनुष्यांच्या उपयोगी पडणारी आहेत. जातीचा काही उपयोग नाही, आणि कुलाचाहि नाही. ९४६ सत्यस्य वचनं श्रेयः सत्यज्ञानं तु दुष्करम् । ___ यद्भूतहितमत्यन्तमेतत्सत्यं ब्रवीम्यहम् ।। १२।२८७।२० [ नारद गालवाला म्हणतात ] सत्य बोलणे चांगले खरे, पण सत्याचे निभ्रांत ज्ञान होणे मोठे कठीण. ज्याच्या योगाने जीवांचे अत्यंत कल्याण होते त्यालाच सत्य म्हणतों. ९४७ सत्यस्य वदिता साधुन सत्याद्विद्यते परम् । ____ तत्त्वेनैव सुदुज्ञेयं पश्य सत्यमनुष्ठितम् ।। ८।६९।३१
[श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात | सत्य सांगेल तो साधु. सत्यापरतें श्रेष्ठ काही नाही. परंतु सत्याचे आचरण करितांना वास्तविक सत्य कोणते हे समजणेच अत्यंत कठीण आहे. ९४८ सत्येन रक्ष्यते धर्मो विद्या योगेन रक्ष्यते ।
मृजया रक्ष्यते रूपं कुलं वृत्तेन रक्ष्यते ।। ५।३४३९ सत्याने धर्माचे रक्षण होते; व्यासंगाच्या योगाने विद्या जिवंत राहते. नेहमी साफसूफ ठेविल्याने रूप टिकून राहते; आणि सदाचरणानें कुलाचे रक्षण होते. ९४९ सत्येन विधृतं सर्व सर्व सत्ये प्रतिष्ठितम् ॥१२।२५९।१०
सर्व काही सत्याच्या पायावर उभे आहे. सर्व काही सत्याच्या आधाराने राहते. ९५० सन्तः परार्थ कुर्वाणा नावेक्षन्ति परस्परम् ॥३२९७४९ परोपकार करणारे संत उलट प्रत्युपकार होण्याची कधीही वाट पहात नाहीत.
For Private And Personal Use Only