________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१५०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
९३८ संवासाज्जायते स्नेहो जीवितान्तकरेष्वपि ।
अन्योन्यस्य च विश्वासःश्वपचेन शुनो यथा १२।१३९।४० आपला प्राण घेणाऱ्याशी सुद्धा सहवासाने स्नेह जडतो, आणि एकमेकांना विश्वास वाटतो. उदाहरणार्थ, कुत्र्याचे मांस खाणारा चांडाल आणि कुत्रा. ९३९ संसारयति कृत्यानि सर्वत्र विचिकित्सते ।
चिरं करोति क्षिप्रार्थे स मूढो भरतर्षभ ॥ ५३३॥३४ (विदुर धृतराष्ट्राला म्हणतो) जो स्वतः करावयाची कामें दुसऱ्यांवर सोपवितो. प्रत्येक बाबतीत फाजील चिकित्सा करीत बसतो, आणि जें कार्य लवकर झाले पाहिजे त्याला दिरंगाई करतो तो मूढ होय. ९४० संहता हि महाबलाः ।। ८।३४७
संघ करून एकत्र राहिलेले लोक अत्यंत वलाढ्य होतात. ९४१ सख्यं सोदर्ययोात्रो
दम्पत्योर्वा परस्परम् । कस्यचिन्नाभिजानामि
प्रीति निष्कारणामिह ॥ १२॥१३८।१५३ सख्खे बंधु अथवा पतिपत्नी यांच्यामध्ये जो परस्पर स्नेह असतो, तोहि कारणामुळेच होय. काही तरी कारण असल्यावांचून जगांत कोणाचे कोणावर प्रेम असल्याचे पाहण्यांत नाहीं ! ९४२ संक्षेपो नीतिशास्त्राणामाविश्वासः परो मतः १२।१३८।१९७
सर्व नीतिशास्त्रांचे थोडक्यांत सार हेच की, कोणाचा विश्वास म्हणून धरूं नये. ९४३ स चेनिकृत्या युध्येत निकृत्या प्रतियोधयेत् । ___ अथ चेद्धमतो युध्येद्धर्मेणैव निवारयेत् ।। १२।९५।९ प्रतिपक्षी जर कपटाने लढेल तर आपणहि उलट कपटानेच लढावे. आणि तो जर धर्मयुद्ध करील तर आपणहि धर्मानेच लढून त्याचे निवारण करावें.
For Private And Personal Use Only