________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थ श्रीमहाभारतसुभाषितानि
८०१ ये न मानित्वमिच्छन्ति मानयन्ति च ये परान् । मान्यमानान्नमस्यन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ।। १२।११०।१९
जे सन्मानाची इच्छा करीत नाहींत, जे दुसऱ्यांना मान देतात आणि सन्मानास पात्र असलेल्यांना प्रणाम करितात ते संकटांच्या पार जातात. ८०२ येन येन शरीरेण यद्यत्कर्म करोति यः ।
तेन तेन शरीरेण तत्तत्फलमुपाश्नुते || १३|७|३
कोणीहि ज्या ज्या शरीरानें जें जें कर्म करतो त्या त्या कर्माचें फळ तें तें शरीर धारण करून भोगतो.
८०३ ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् || ६|२८|११ [ श्रीकृष्ण म्हणतात ] जे मला ( परमेश्वराला ) जसे भजतात तसें मी त्यांना फल देतों.
८०४ येऽर्थाः स्त्रीषु समायुक्ताः प्रमत्तपतितेषु च ।
१२९
ये चानायें समासक्ताः सर्वे ते संशयं गताः || ५|३८|४२ जीं कामें स्त्रिया किंवा झिंगलेला अथवा पतित मनुष्य यांच्यावर सोपविलीं गेलीं, तसेंच जीं कामें अनार्य मनुष्याकडे दिली गेलीं तीं सगळीं संशयांत पडली. ८०५ येषां त्रीण्यवदातानि विद्या योनिश्च कर्म च ।
तान्सेवेतैः समास्या हि शास्त्रेभ्योऽपि गरीयसी ॥। ३।१।२७
विद्या, कुल आणि आचरण हीं तीन ज्यांचीं शुद्ध आहेत त्यांची संगत धरावी. खरोखर, त्यांचा समागम शास्त्राभ्यासापेक्षांहि श्रेष्ठ होय. ८०६ येषां शास्त्रानुगा बुद्धिर्न ते मुह्यन्ति भारत ॥ १।१।२४४
( संजय धृतराष्ट्राला म्हणतो ) ज्यांची बुद्धि शास्त्रानुसार चालते ते भांबावून जात नाहींत.
८०७ ये हि धर्मस्य लोप्तारो वध्यास्ते मम पाण्डव ।। ७।१८१।२८ ( श्रीकृष्ण म्हणतात. ) अर्जुना, जे धर्म बुडवणारे असतील ते माझ्याकडून मारिले जाण्यास योग्य होत.
म. भा. ९
For Private And Personal Use Only