________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१३०
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
८०८ ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते ।। . आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः ॥ ६।२९।२२
( श्रीकृष्ण म्हणतात. ) अर्जुना, इंद्रियांचा विषयांशी संबंध घडल्याने जे भोग उत्पन्न होतात ते खरोखर दुःखाचे माहेरघरच होत, त्यांना आदि असून अंतहि असतो. त्यांच्या ठिकाणी शहाणा पुरुष रममाण होत नाही. ८०९ योगः कर्मसु कौशलम् ॥ ६।२६१५०
योग म्हणजे कर्मे करण्याचे कौशल्य. ( कर्मफलाचा लेप न लागेल अशा रीतीने निष्कामबुद्धीने कर्मे करणे.) ८१० यो दुर्लभतरं प्राप्य मानुष्यं द्विषते नरः।
धर्मावमन्ता कामात्मा भवेत्स खलु वञ्च्यते।।१२।२९७३४ जो कोणी मनुष्य दुर्लभ मनुष्ययोनीत उत्पन्न होऊनहि धर्माचा द्वेष किंवा निदान अवमान करतो आणि कामोपभोगांत गढून जातो त्याची अखेर फसगत होते. ८११ यो न दर्शयते तेजः क्षत्रियः काल आगते ।
सर्वभूतानि तं पार्थ सदा परिभवन्त्युत ॥ ३।२७।३८ [ द्रौपदी धर्मराजास म्हणते. ] हे कुंतीपुत्रा, समय प्राप्त झाला असतां जो क्षत्रिय आपलें तेज प्रकट करीत नाही त्याचा अपमान सर्व प्राणी नेहमी करीत असतात. ८१२ योऽन्यथा सन्तमात्मानमन्यथा प्रतिपद्यते ।
किं तेन न कृतं पापं चौरेणात्मापहारिणा ॥ ५॥४२॥३७ जो आपले खरे स्वरूप एकाप्रकारचे असतां ते दुसऱ्या प्रकारचे असल्याचे भासवितो, त्या स्वतःचे खरे स्वरूप लपविणाऱ्या चोराने कोणतें पाप केलें नाहीं ? ८१३ यो मा प्रयतते हन्तुं ज्ञात्वा प्रहरणे बलम् ।
तस्य तस्मिन्पहरणे पुनः प्रादुर्भवाम्यहम् ॥ १४॥१३॥१३ [ काम म्हणजे अहंकार म्हणतो. ] एकाद्या आयुधांत सामर्थ्य आहे असे समजून जो मला त्याने मारण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या त्या आयुधांतच मी फिरून उत्पन्न होतो.
For Private And Personal Use Only