________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१२८
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
७९५ युक्ता यदा जानपदा भिक्षन्ते ब्राह्मणा इव ।
अभीक्ष्णं भिक्षुरूपेण राजानं नन्ति तादृशाः॥१२।११।२३ राष्ट्रांतील प्रजा उद्योगशील असूनहि जर ( उद्योगाच्या अभावामुळे) भिक्षुरूपी बनून ब्राह्मणांप्रमाणे वारंवार भिक्षा मागू लागली तर तिच्यायोगाने राजाचा वध होतो. ७९६ ये च मूढतमा लोके ये च बुद्धः परं गताः।
त एव सुखमेधन्ते मध्यमः क्लिश्यते जनः ।१२।२५।२८ जगांत जे अत्यंत मूढ असतील, अथवा जे ज्ञानाच्या पैलतीराला पोचलेले असतात तेच सुखाने नांदत असतात. मध्यम स्थितीतल्या लोकांना क्लेशच होतात. ७९७ ये तु बुद्धया हि बलिनस्ते भवन्ति बलीयसः।
प्राणमात्रबला ये वै नैव ते बलिनो मताः॥१२॥१५६।१३ जे बुद्धीने बलिष्ठ असतील, तेच खरे प्रबळ होत. जे केवळ शारीरिक बलाने संपन्न ते खरोखर बलवान् नव्हत. ७९८ ये दम्भान्नाचरन्ति स्म येषां वृत्तिश्च संयता ।
विषयांश्च निगृह्णन्ति दुर्गाण्यतितरन्ति ते ॥१२॥११०३ जे दांभिकाचरण करीत नाहीत, ज्यांची वृत्ति संयमशील आहे व जे विषयांना जिंकतात ते सर्व संकटांतून पार पडतात. ७९९ ये धनादपकर्षन्ति नरं स्वबलमास्थिताः ।
ते धर्ममर्थ कामं च प्रमश्नन्ति नरं च तम् ॥ ५/७२।२४ स्वतःच्या बलाचा आश्रय करून जे एकाद्या मनुष्याचे द्रव्य हिरावून घेतात, ते त्याचा धर्म, अर्थ व काम आणि तो मनुष्य या सर्वांचा विध्वंस करतात. ८०० येन खटां समारूढः परितप्येत कर्मणा ।
. आदावेव न तत्कुर्यादध्रुवे जीविते सति ॥ ५॥३९॥२९
खाटेवर (म्हणजे मृत्युशय्येवर ) पडल्यावर ज्या कृत्यामुळे पश्चात्ताप करण्याचा प्रसंग येईल असे कृत्य प्रथमतःच करूं नये, कारण जीवित क्षणभंगुर आहे.
For Private And Personal Use Only