________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
११. वज्जालग्गं
(4) दीन-पद्धती १. माते, दुसऱ्याकडे याचना करण्यात गढून गेलेल्या अशा मुलास
जन्म देऊ नको (आणि) ज्याने (दुसऱ्याने केलेली) याचना धुडकावून लावली आहे त्याला उदरातही थारा देऊ नयेस. जोवर 'द्या' अशी याचना करत नाही, तोवरच रूप, गुण, लन्जा, खरेपणा, घराण्याची परंपरा आणि स्वाभिमान (अशा या सर्व गोष्टी) असतात. . 'खरोखर विधीने या जगामध्ये गवत-कापसापेक्षाही हलका असा दोन (मनुष्य) निर्माण केला आहे.' ' (मग) वाऱ्याने त्याला का वाहून नेले नाही ? ' ( कारण ) आपल्याकडे
(च) याचना करेल या भीतीने.' ४. द्या' अशी दुसन्याकडे याचना करत असताना त्या (स्वाभी.
मानी दीन माणसा) चे हृदय धडधडू लागते, जीभ षशात अडखळते आणि चेहऱ्यावरील तेज नाहीसे होते. ढग समुद्रातील पाणी प्रयत्नपूर्वक (शोषून) घेत असता काळे. कुट्ट होतात आणि, खरे म्हणजे, (पाऊसाच्या रूपाने पाणी) देत असताना धवल होतात. ( दुसऱ्याकडून दान.) घेणारे आणि ( दुसऱ्यांना दान ) देणारे यांच्यामधील ( मोठे) अंतर पाहा.
For Private And Personal Use Only