________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
(R) सिंह-पद्धती ६. कर्तव्यपराङ्मुख व स्वाभिमानशून्य अशी अनेक पाडसे
असून हरणीला काय कामाची ? हत्तीचे गंडस्थळ फोडणाऱ्या एकाच छाव्याने सिंहीन निर्धास्तपणे झोपते. विशुद्ध जातीच्या त्या बनराजांना प्रणाम असो. अहाहा ! या पृथ्वीवर जे जे ( जातिवंत ) कुळात जन्मतात ते ते
(छावे) हत्तींचे गंडस्थळ विदीर्ण करणारे होतात. ८. मोठया (शरीराच्या) आकाराने माणसाला मोठेपण प्राप्त
होते असे समजू नका. वनराज लहान असला तरीही मोठ्या
हत्तींचे गंडस्थळ विदीर्ण करतो. ९. दोघेही अरण्यात जन्मतात, (पण) हत्ती जखडले जातात
सिंह मुळीच नाही. थोर पुरुषांच्या बाबतीत मरण संभवनीय
आहे, अपमान नव्हे. (र) चंदन-पढ़ती १०. चंदन वाळले किंवा ( साणेवर ) घासले तरीही खरोखर
तसला कसला तरी घमघमाट सुटतो की जेणेकरून ताज्याही
फुलांचा हार सुगंधामध्ये लज्जित होतो. ११. कुन्हाडीच्या घावाने छेदले (किंवा ) (दगडावर) घासले
तरी (सुगंध देण्याचा मूळ) स्वभाव सोडत नाहीस, म्हणून हे चंदना, सोक मस्तक नमवून तुला वंदन करतात.
For Private And Personal Use Only