________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
६. (हा पंच नमस्कारमंत्र) (शाश्वत) कल्याणरूपी कल्पवृक्षाचे
अवध्य (म्ह. न मरणारे) बीज आहे, संसाररूपी हिमपर्वताच्या शिखरांना ( वितळवून टाकणारा ) प्रखर सूर्य आहे आणि
पापरूपी नागांना पक्षी राजा (गरुड) आहे. ७. नवकार महामंत्राने रोग, पाणी, अग्नी, चोर, सिंह, हत्ती,
युद्ध, साप यांपासूनची भये त्याचक्षणी नाश पावतात.. ८. डाकीण, बेताळ, राक्षस, महामारी यांच्या भयाचा प्रभाव त्याच्यावर किंचितही पडत नाही. नवकार ( मंत्रा) च्या प्रभावाने सर्व संकटे नाहीशी होतात. १. ज्यांच्या हृदयरूपी गुहेमध्ये नवकारमत्ररूपी सिंह सदासर्वकाळ वास करतो आहे, त्यांच्यावर अष्टकर्मग्रंथीरूपी
हत्तींचा हल्ला झाला असताना त्यांचाच नाश होतो. १०. ज्याच्या मनामध्ये जिनशासनाचा (दर्शनाचा) सार असलेला
आणि चवदा पूर्वांचा उद्धार करणारा नवकार ( मंत्र) आहे. त्याला संसार काय करणार ?.. ११. नवकाराहून दुसरा सारमूत मत्र त्रिभुवनात नाही. म्हणून,
खरोखर, दररोजच अत्यंत भक्तिभावाने त्याचे पठन करावे. १२. जेवायच्या वेळी, झोपताना, जागे होताना, (कोठेही)
प्रवेश करताना, भयप्रसंगी आणि संकटात, सर्व काळच खरोखर नवकार (मंथा। चा जप करावा. (शा. मंत्राचे स्मरण करावे).
For Private And Personal Use Only