________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१० नवकारमंत्राचा प्रभाव
, अत्युत्तम पूजेस पात्र असणान्या अरिहंतांना वंदन असो.
(अनंत) सुखाने संपन्न असणाऱ्या सिद्धांना वंदन असो, पाच प्रकारचे आचार पाळत असलेल्या आचार्यांना बंदन असो. स्वाध्याय आणि ध्यानामध्ये रममाण असणा-या उपाध्यायांना वंदन असो. निर्वाणा ( करिता साधना करणारे ) साधक
असलेल्या मुनींना वंदन असो. २. हा पंचनमस्कार (मंत्र ) सर्व पापांचा नाश करणारा
असून सर्व मंगलामध्ये प्रमुख मंगल आहे. ३. दीर्घकाळही तप आचरिले, सदासर्वकाळ (व्रतांचं ) आचरण (केले) आणि सिद्धांत शास्त्राचे (श्रुताचे) पुष्कळ पठण केले
आणि जर नमस्कारात मन नसेल तर ते (सर्व) निष्फळ झाले. ४. मनाने चितिलेले, वाचने प्रथिलेले आणि कायने आरंभलेले
(कार्य) जोवर नमस्कार (मंत्रा) चे स्मरण केले जात नाही तोवर (पुरे) होत नाही. ५. हा ममस्कर (मंत्र) संसाररूपी समरांगणात पडलेल्यांना
आश्रयाचे ठिकाण आहे. असंख्य दुःखांच्या नांशाचे कारण आहे आणि मोक्षमार्गाचा हेतू आहे.
For Private And Personal Use Only