________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
९ मूर्खपणाचे बक्षीस
राजा-पण हे दोघे कोण? विदूषक-हा कंचुकी आणि (श. पण) ही दाई. राजा- (जवळ जाऊन) दाई आणि कंचुकींचे कुशल आहे ना? दोघे- (स्वगत) कसे महाराजच आले ? (उघड) महाराजांच्या
पदकमलांच्या दर्शनाने. विदूषक-माझ्याही असे म्हणा. प्रतिहारी-आर्य, चोहोकडूनही कशा माकडचेष्टा प्रकट करतोस? विदूषक-हं ! आता काही सुद्धा म्हणू नको. भूकेने व तहानेने _ व्याप्त झालो आहे. प्रतिहारी-माझ्या हाती येत आहे. मंदारक-खरोखर पिशाच्च पिशाच्चाला पीडा देत नाही. राजा-तसे म्हणू नको. खरोखर- (हा) ब्राह्मण आहे. विदूषक- (क्रोधाविष्ट होऊा) थेरड्या, पुनः एक वेळ बोल. मंदारक-तुझा बाप म्हातारा झाला नव्हता का? विदूषक-महाराज जवळ असताना त्यांच्या मित्राच्या वडिलांना . कसे दूषण देतोस ? पिंगलक-तू कशी महाराजांच्या कंचुकीची चेष्टा केलोस ? विदूषक-पिंगलक, राजाचा प्रिय मित्र असलेल्या माझा अपमान
करू नको. (पिंगलक लाजतो.)
For Private And Personal Use Only