________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
तुझे मन मोहून टाकतात का ?'
राजकुमारी म्हणाली, 'कपिजले, गुंफलेली ही वरमाला अत्यंत रमणीय आहे.' भद्रेने विचार केला, ‘उत्तर न देणे हाच यांना नकार आहे.' तेव्हा पुढे जाऊन भद्रा म्हणाली,
___ 'कोकीळकंठी, ज्यांच्या तलवाररूपी राहू (दत्या) ने शत्रूच्या कीर्तीचंद्रांना ग्रासिले आहे त्या कलिंगाधिपती जय (महाराजां) च्या गळ्यात माळ घाल.'
राजकुमारी म्हणाली, 'तातासमान वृद्ध वय ( श. परिपक्व वय) झालेल्या यांना प्रणाम असो' तेव्हा भद्रेने पुढे जाऊन म्हटले,
‘गजगामिनी, ज्यांच्या हत्तींच्या कळपांच्या (गळयातील) घंटांच्या निनादाने जणू ब्रह्मांड फुटते ते हे गौडपती बीरमुकुट (महाराज) तुला आवडतात का ?'
राजकुमारी म्हणाली, 'बाई ग ! असेही माणसांचे काळेकुट्ट भयानक रूप असते ? त्वरित पुढे चल, माझे हृदय थरथरू लागले.' तेव्हा किंचित हसत भद्रा पुढे गेली आणि बोलू लागली,
हे पद्माक्षी, सिप्रा नदीच्या किनाऱ्यावरील वृक्षवाटिकेत क्रीडा करण्याची इच्छा असेल तर या अवंतिपती पद्मनाभांना नाथ कर.'
राजकुमारी म्हणाली, 'हुशऽ ! या स्वयंवरमंडपात फिरून मी दमून गेले. तेव्हा अजून किती वेळ सांगणार आहे ?' भद्रेने' विचार केला, " हे पण माझ्या मनाला भानंद देत नाहीत," असे
For Private And Personal Use Only