________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
(२०)
'दृढ बाहुबल असलेले बल नावाचे हे काशीनगरीचे महाराज आहेत. (उंचच) उंच (उफाळणा-या) लाटा असलेली गंगा (नदी) पाहण्याची इच्छा असेल तर यांना वर.'
दमयंती म्हणाली, 'भद्रे, काशीतील निवासी दुसन्याची फसवणूक करण्याची सवय असलेले आहेत असे ऐकायला येते. तेव्हा माझे मन यांच्यात रमत नाही म्हणन पुढे हो.' तसेच करून तो म्हणाली,
या हतींना सिंहच असे हे सिंह नावाचे कुंकणाधिप महाराज आहेत. यांना वरून ग्रीष्मऋतूमध्ये केळीच्या बनात (यांच्याशी । सुखान क्रीडा कर.'
दमयंती म्हणाली, 'भद्रे, कुंकणवासी विनाकारण रागाव. तात, तेव्हा पावला-पावलागणिक यांची मनधरणी करणे मला शक्य होणार नाही. तेव्हा दुसऱ्याविषयी सांग.' पुढे होऊन ती म्हणाली,
‘महेंद्राप्रमाणे सौंदर्य असलेले हे महेंद्र काश्मीर देशचे महाराज आहेत. केशराच्या वाटिकेमध्ये क्रीडा करण्याची मनीषा असेल तर यांना वर.'
राजकुमारी म्हणाली, 'भद्रे, माझे शरीर ( गार ) तुषारसंचयाला घाबरते हे तुला माहित नाही का? तेव्हा येथून जाऊया,' असे म्हणत असताना द्वारपालिका पुढे जाऊन म्हणू लागली,
"विपूल द्रव्यभांडार असलेले हे जयकोश महाराज कौशांबोचे स्वामी आहेत. मृगनयने, कामदेवाप्रमाणे रूप असलेले हे
For Private And Personal Use Only