________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
जर वायाप्रमाणे मी उपटून काढले नाही, तर मी प्रवचन संयमाचा घात करणाऱ्या आणि त्यांची उपेक्षा करणाऱ्यांच्या गतीस जाईन.' तेव्हा कपटाने उन्मत्त वेष धारण करून कालकाचार्य असंबद्ध बडबडत नगरामध्ये फिरू लागले
'जर गर्दभिल्ल राजा असेल तर यापेक्षा चांगले काम असणार ? जर अंत:पुर रमणीय असेल तर यापेक्षा चांगले काय असणार ? जर प्रदेश रम्य असेल तर यापेक्षा चांगले काय असणार ? जर राजधानी (श. नगरी) चांगली वसली असेल तर यापेक्षा चांगले काय असणार ? जर लोक चांगला वेष धारण केले असतील तर यापेक्षा चांगले काय असणार ? जर मी भिक्षेकरिता फिरलो तर यापेक्षा चांगले काय असणार? जर ओसाह परात झोपलो तर यापेक्षा चांगले काय असणार ?'
आता आचार्य पारसकुलात जाऊन मंत्र्यासह राजाच्या दरबारात जाऊन सर्वांना सुखकर बोलू लागले. अशारीतीने त्यांनी गोड बोलून (श. वचन रसाने) राजा इत्यादि लोकांना रंजविले. विद्यादि गुणांमुळे शकराजाने त्यास गुरू मानले. तेव्हा आचार्यांच्या सांगण्यावरून सर्व शकसैन्य दुष्ट गर्दभिल्लावरोबर युद्ध करण्याला निघाले. आता ते जात असताना पर्वत हलू लागले, पृथ्वी थरथरू लागली आणि धूळोने सूर्य झाकला. क्रमाने सिंधुनदी ओलांडून ते सौराष्ट्रपरिसरात आले. आता पावसाळा सुरू झाल्यामुळे ते तेथे राहिले. शरदऋतू सुरू झाल्यावर गर्द भिल्लाने ज्या लाट राजांचा अपमान केला होता ते आणि दुसरे एकत्र येऊन त्यांनी उज्जनीस वेढा घातला.
For Private And Personal Use Only