________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
एकदा रात्री भून्यमनस्क आचार्यांना पाहून शासनदेवता म्हणाली, ' मुनिवर, मनात दुःख धरू नका. सरस्वतीला शीलाने सीतेसमान माना. तिच्या शीलप्रभावाने आपणांस विजय प्राप्त होईल.' असे म्हणून ती अदृश्य झाली.
आता प्राकार शून्य पाहून शकादिराजांनी आचार्यांना विचारले. तेव्हा गर्दभीविद्या साध्य झालेले आचार्य म्हणाले, 'आज अष्टमीचा दिवस. गर्दभिल्ल राजा उपवास करून गर्दभीविद्या साधेल. नंतर ती गर्दभी मोठ्या आवाजाने आरडेल. शत्रसैन्यातील जे तिर्यंच (पशूदि) किंवा मानव आवाज ऐकतील ते सर्व रक्त ओकीत भयाने व्याकुळ व चेतनाविहीन होऊन धरणीवर कोसळतील.' तेव्हा आचार्यांच्या आदेशाने जोवर गर्दभीने तोंड उघडन आवाज केला नाही, तोवर योध्यांनी आपल्या बाणांनी तिचे मुख भरून टाकले. शक्तीहीन झालेली ती गर्दभिल्लावर मलमूत्र विसर्जन करून त्याला लाथांनी मारून गेली.
योध्यांनी (उज्जनी) नगरी हस्तगत केली, 'अरे दुराचारी, दुसन्या जन्मात पापवृक्षाचे फूल आणि नंतर नरक फळ मिळेल.' क्षमा करून गर्दभिल्लाला उज्जैनीतून हाकलून दिले. शकराजाला राज्यावर बसविले आणि म्हटले, 'शकराजा, न्यायी आणि प्रजावत्सल हो. धर्माने राज्याचे पालन कर. धर्माने राज्य अमर होईल आणि अधर्माने नाश पावेल. हे विसरू नकोस.' ___आता आचार्य स्वतः संयमात स्थिर झाले. त्या सरस्वती भगिणीलाही प्रायदिचस्ताने संयमात शुद्ध करण्यात आले.
For Private And Personal Use Only