________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
तेथे अत्यंत बलशाली व स्त्रीलंपट असा मर्दभिल्ल राजा होता. त्याने त्या रूपसुंदरी (साध्वी ) ला पाहिले. 'हाय ! जर विषयसुखांचा त्याग करून ही युवतीही व्रत पाळू लागली, तर पुरुषार्थ विफल झालेला कामदेब आजही कसा विजयी आहे ?' असा विचार करून कामपिशाच्चाने झपाटलेल्या त्या दुष्टाने 'हाय ! प्रवचननाथ सद्गुरू कालक मुनिश्वर भाऊ चारित्र्यधन हिरावून नेले जात असलेल्या माझे अनार्यराजापासून रक्षण कर.' अशारीतीने विलाप करणाऱ्या त्या तरुण साध्वीला तिची इच्छा नसतानाही त्याने बळजबरीने घेऊन अंतःपुरात टाकले.
आता मालकाचार्यही खरोखर ही गोष्ट मासीतरी जाणूच राजापाशी जाऊन मृदुशब्दांनी म्हणाले, .. 'ज्याप्रमाणे तारकांमध्ये चंद्र,देवगणामध्ये इंद्र, त्याच प्रमाणे, हे राजा, लोकांमध्ये तूच मुख्य आहेस. तेव्हा तू असे कसे करतोस ?
राजा अजाणपणही परस्त्रीचा संग दुःखदायक असतो. पुनः जो साध्वीशी संग तो तर अत्यंतिक महापाप आहे.
राजा, अनेक राजकन्यांशी मिलन करूनही तू तृप्त झाला नाहीस. राजे मुनींचा धर्म बाढवितात, लुटत नाहीत. तेव्हा या (गोष्टीं) चा विचार करून स्वतःच माझ्या बहिणीला सोड.' अशारीतीने युक्तिप्रयुक्तीने आचार्यांनी सांगूनही राजाने साध्वीला सोडले नाही. ज्याप्रमाणे आयुष्य क्षीण झालेल्यास महाऔषधी व्यर्थ आहे, त्याप्रमाणे आचार्याचा, संघाचा आणि मंत्र्यांचा बोध व्यर्थ झाला. तेव्हा क्रोधाविष्ट झालेल्या कालकाचार्यानी प्रतिक्षा केली, 'पृथ्वीमध्ये बद्धमूल झालेलेही गर्दभिल्ल राजाल्मी शास
For Private And Personal Use Only