________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
२ कालकाचार्यांची कथा
येथे भारतवर्षामध्ये अमरावतीप्रमाणे धारावास नगर होते तथे सिंहाप्रमाणे (पराक्रमी असा) वैरीसिंह राजा होता. त्याची गुणशीलसंपन्न रूपवती अशी सुरसुंदरी नावाची राणी होती. शिंपल्यातील मोत्याप्रमाणे तिच्या पोटी कालक नावाचा महागुणी पुत्र झाला. नाव व गुणांनी (सार्थ अशी त्याची सरस्वती नावाची बहिण होती.
___ आता एकदा राजकुमार क्रीडा करण्याकरिता (नगरा) बाहेरील बगेत गेला. तेथे त्याने आंब्याच्या झाडाखाली गुणधर नावाचे आचर्य पाहिले. विनयाने ( त्यांच्या) चरणांना वंदन करुन तो आचार्यांचा उपदेश ऐकू लागला. _ 'शरीर अनित्य आहे, वैभव शाश्वत नाही, आणि मृत्यू नेहमी जवळ आहे, (तेव्हा) धर्मसंग्रह करणे कर्तव्य होय.' इत्यादि धर्मोपदेश ऐकून कुमार आत्मजागृत झाला आणि त्याने सरस्वतीसमवेत दीक्षा घेतलो. लौकरच श्रुतज्ञानाचे अध्ययन करून तो ज्ञानी मुनी झाला. 'हा योग्य आहे.' आसे जाणून आचार्यवरांनी त्यास आचार्यपदावर
स्थापले.
कालकाचार्य अनेक शिष्यासमवेत गावोगाव भव्यजनांना हितोपदेश करीत उज्जनीत आले. उत्तम चारित्र्याने विभूषित सरस्वती साध्वीही साध्वींच्या बरोबर तेथे गेली.
For Private And Personal Use Only