________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
आलास?' त्याने घडले होते तसे सांगितले आणि विगयपूर्वक हात जोडून म्हटले, 'भगवान, मी विद्यार्थी वडिलासमान असलेल्या तुमच्या पायापाशी आलो आहे. तेव्हा विद्या शिकवण्याची माझ्यावर कृपा करावी.' पुत्रप्रेम वाटत असलेल्या उपाध्यायांनीही म्हटले, 'बाळ, विद्याध्ययनाचा तुझा प्रयत्न स्तुत्य आहे. विद्या नसलेला मनुष्य पशू असून त्याला (काहीच) महत्व नसते. इह व परलोकी विद्या कल्याणप्रद आहे. तेव्हा विद्या शिक. विद्येची सर्व साधने. तुझ्या स्वाधीन आहेत. परंतु अपरिग्रही असल्यामुळे माझ्या घरी भोजन (मिळणार नाही. त्या शिवाय शिकणे होणार नाही.' तो म्हणाला, ' केवळ भिक्षा मागूनही भोजन मिळवता येईल. उपाध्याय म्हणाले, 'भिक्षावृत्तीने शिकणे होणार नाही. तेव्हा चल, तुझ्या भोजनाकरिता कोणातरी श्रीमंताकडे विनवणी करू या.'
. ते दोघेही तथे राहत असलेल्या शालिभद्र श्रेष्ठीकडे गेले. श्रेष्ठीने ( येण्याचे ) कारण विचारले. उपाध्याय म्हणाले, 'हा माझ्या मित्राचा पुत्र विद्यार्थी म्हणून कौशांबीतून आला आहे. आपल्याकडे भोजन करेल व माझ्यापाशी विद्या शिकेल. विद्या शिकण्याला साहाय्य केल्यामुळे तुम्हाला मोठे पुण्य लागेल.' त्याने आनंदाने मान्यता दिली...
तो तेथे जेवग करून अध्ययन करू लागला. दासी त्यास वाढत असे. तो स्वभावतःच थट्टेखोर होता. तारुण्याच्या अत्यंतिक विकारामुळे आणि कामविकाराच्या दुर्जयतेमुळे तो तिच्यावर अनुरक्त झाला आणि तीही त्याच्यावर (प्रेम करू लागली).
For Private And Personal Use Only