________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
१ कपिल मुनीचे चरित्र
त्या काळी आणि त्या वेळी कौशांबी नावाची नगरी होतो. (तेथे) जितशत्रु राजा होता. काश्यप ब्राह्मण चौदा विद्यास्थानामध्ये पारंगत असून राजाकडून बहुमानिला जात होता. त्याच्या उपजीविकेची व्यवस्था केली होती. त्याची यशा नावाची पत्नी होती. त्यांना कपिल नावाचा पुत्र होता. तो कपिल लहान असतानाच काश्यप मरण पावला.
तेव्हा तो मेल्यावर राजाने ते पद दुसऱ्या ब्राह्मणास दिले. तो ( मस्तकावर ) छत्र धरले जात असताना घोड्यावरून (मोठया थाटाने) जात असे. त्याला पाहून (पतीचे वैभव आठबून) यशा रडू लागली. कपिलाने विचारले. तिने सांगितले ते असे-'तुझे वडील अशाच थाटाने जात असत, कारण ते विद्यासंपन्न होते.' तो म्हणाला 'मी पण अध्ययन करीन.' ती म्हणाली, 'येथे तुला मत्सराने कोणी शिकवणार नाही. श्रावस्ती नगरीत जा, तेथे तुझ्या पित्याचा मित्र इंद्रदत्त नावाचा ब्राह्मण आहे. तो तुला शिकवील.'
तो श्रावस्तीस गेला. त्या ( गुरू ) जवळ जाऊन त्यांच्या चरणांवर त्याने लोटांगण घातले. (गुरूनी) विचारले, 'तू कोठून
For Private And Personal Use Only