________________
५८
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ आणि भूतदया यांनी ओतप्रोत असलेले त्यांचे जीवन आमच्यापुढे असा ज्वलंत आदर्श ठेवते की जे आम्हा सर्वांना अनुकरणीय आहे. हेच सत्पुरुष आम्हाला खऱ्या मार्गाने नेणारे असतात.'
- सर एम्. चंद्रशेखर अय्यर
न्यायाधीश, सुप्रीम हायकोर्ट, दिल्ली 'असे संत प्रकृतीचे सत्पुरुष श्रद्धेला आणि आदराला पात्र आहेत.'
-आसफ अली
भारतीय राजदूत, स्वित्झर्लंड 'विश्वभ्रातृत्वाची स्थापना, प्रेम व अहिंसेचा प्रचार यासाठी होणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाचे मानवताप्रेमी माणसाने स्वागत केले पाहिजे, इतकेच नव्हे तर त्यास सहकार्य केले पाहिजे. आचार्यश्री चिरंजीव होवोत व प्रेमाचा संदेश सर्वत्र पसरो.'
-श्री. रंगनाथ दिवाकर
भूतपूर्व केन्द्रमंत्री व राज्यपाल, बिहार शांति व अहिंसा यांचा प्रसार करणाऱ्या आचार्यांच्या चरणी मी श्रद्धाञ्जली समर्पित करताना स्वतःला धन्य समजतो. माझी इच्छा आहे त्यांचे अनुयायी त्यांचे महान् उदाहरण डोळ्यांपुढे ठेवून जीवनाचा मार्ग आक्रमतील आणि भारताला पुनः प्राचीन श्रेष्ठता व शांती, समृद्धी मिळवून देण्यात सहाय्यक होतील.
-श्री. आर. के. सिध्या
___केन्द्रिय राज्यमंत्री, गृहखाते 'विश्वमैत्री, भ्रातृत्व व विश्वशांती यांचे प्रतीक श्री आचार्य शांतिसागर महाराज मानव जातीचे जे आध्यात्मिक कल्याण साधक आहेत त्यासंबंधी कोण अपरिचित आहे ? आजच्या कठीण समयी आचार्यश्रींची गंगेसारखी पवित्र व निःस्पृह वाणी केवळ आत्मोद्धारकच नव्हे तर समाजघातक प्रवृत्तींना रोकण्यास सिद्ध झाली आहे. केवळ जातिविशेषासाठी नव्हे, समस्त मानव जातीस ती लाभदायक आहे. आचार्यश्रींच्या चरणी श्रद्धा व भक्ती प्रदर्शित करून त्यांना दीर्घायूची कामना करतो.'
-ना. मिश्रीलाल गंगवाल
मुख्यमंत्री, मध्यभारत __'भारताच्या पुनरुत्थानाचे श्रेय जर कोणत्या धर्माला द्यायचे असेल तर ते जैनधर्माला व त्यातून उत्पन्न झालेल्या महान् संतांनाच दिले पाहिजे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह यांचे सिद्धान्त राष्ट्रपिता गांधीजी स्वतंत्रता व जनतंत्रवाद यांच्या प्राप्तीसाठी अमलात न आणते. तर ते केवळ अस्पष्ट व अग्राह्य असे आदर्शमात्र राहिले असते. आणि ते अंमलात आले याचे कारण सर्व जैन संतांचे निर्मळ जीवनच होय. आमचे सौभाग्य आहे की अशा सत्पुरुषांचे मुकुटमणी आचार्यश्री शांतिसागर विद्यमान आहेत व त्यांची ८१ वी हीरकजयंती भारतात साजरी होत आहे.
डॉ. पट्टाभि सीतारामय्या
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org