________________
विचारवंतों के दृष्टि में आचार्य श्री दिव्यज्ञानी होते
१९३५ साल मधील एक सत्य घटना १९३० मे ८ रोजी महात्मा गांधींना ब्रिटिशांनी अटक केली. त्यामुळे सोलापुरातील सर्व जनता संतापली. तीव्र आंदोलन सुरू झाले. माझे हुतात्मा मित्र मल्लप्पा धनशेट्टी आदि पकडले गेले. माझ्यावर चारंट होतेच. मी बाहेर भूमिगत राहून कार्य करू लागलो. श्रीशैल येथे भिल्ल लोकांमध्ये सहा महिने राहिलो. तसेच गुलबर्गा, कोल्हापूर, कोकण प्रांतात जावून बेळगावलाही गेलो. जुने बेळगावात असतांना तेथील जिनमंदिरामध्ये श्री आचार्य शांतिसागर महाराज यांच्या संघाचे वास्तव्य होते. त्यांचा उपदेश ऐकण्यास दररोज जात होतो. सुमारे एका महिन्यानंतर उपदेश संपल्यावर कानडीमध्ये आचार्य श्री मला बोलावून म्हणाले, " की बाळ ! त् किती महिन्यांपासून आपले जीवन लपून ठेवलेस परंतु आता वेळ संपली आहे. तू निर्धास्त आपल्या जन्मभूमीस जावू शकतो." त्यानंतर मी सोलापुरास आलो. मात्र आचार्य शांतिसागर महाराज यांचे वाक्य अजूनपर्यंत माझ्या कानावर गुंगतच राहिले आहे. खरोखर आचार्यश्रींना हे गुपित कळंले कसे ? हे आजपर्यंत गुपितच राहिले आहे.
आचार्यश्रींनी कुंथलगिरी येथे यमसल्लेखना घेतल्यावर तीन वेळा जावून दर्शन करून आलो. त्यांचा मजवर प्रसादपूर्ण आशीर्वाद होता यात शंका नाही. त्यामध्ये मला धन्यता वाटते.
सिद्रामाप्पा फुलारी माजी नगराध्यक्ष, सोलापूर
हीरक जयन्तीप्रसंगी आलेल्या शुभभावना
(१४ जून १९५२) 'असेच ऋषी आमच्या देशाच्या आत्म्याची मूर्तिमंत प्रतीके होत.'
-सर राधाकृष्णन्
(तत्कालीन) उपराष्ट्रपती, भारत 'आचार्यश्रींचे जीवन केवळ त्यांच्या अनुयायींनाच नव्हे तर साऱ्या सार्वजनिक कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे आहे. या शुभप्रसंगी त्यांच्या चरणी माझी आदराञ्जलि अर्पित करतो.'
-जी. व्ही. मावळणकर
अध्यक्ष, भारतीय लोकसभा 'शुद्ध आणि पवित्र पुरुष मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही सिद्धान्तास मानणारा असो, तो विशिष्ट समाजात वा जातीत जन्म घेऊनही त्या समाजाचा किंवा जातीचाच केवळ असत नाही. अशा थोर विभूती मानवजातीलाच हितकर असतात. आचार्यश्री अशाच महान् संतांपैकी एक आहेत. अहिंसा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org