________________
- स्मृति-मंजूषा
१६५ निर्णयानुसार श्रीक्षेत्र कुंथलगिरीकडे विहार करीत असता त्यांच्या सदुपदेशाने नातेपुते येथे श्री. रामचंद्र धनजी दावडा यांनी अशा अनाथ आश्रमाकरिता नऊ हजार रुपयांचे दान जाहीर करून संकल्पित कार्याला हातभार लावला व यातून अनेक धर्मप्रेमी जनांना प्रेरणा लाभली.
___ ता. १४-२-२७ रोजी बारामती येथील रथयात्रा महोत्सव प्रसंगी आचार्य महाराजांच्या उपस्थितीत सर्व प्रतिष्ठित जैन समाजाच्या विचारमंथनातून अशा स्वरूपाचा आश्रम नांदणीस काढावा असे दिसू लागले. 'पण मी सदर आश्रम शेडवाळ गावी असावा अशी सूचना मांडली. कारण शेडवाळला जैन समाज मोठा व तेथील दिगंबर जैन महासभाही गाजलेली. अर्थात महाराजांचे सह सर्व लोकांनी ही सूचना उचलून धरली आणि त्याप्रमाणे दिनांक ४-६-१९२७ रोजी शेडवाळ येथे आश्रमाच्या कार्यास प्रारंभ झाला. आचार्यश्रींच्या व सर्व जैन समाजाच्या इच्छेनुसार प्रथम महामंत्री म्हणून संस्थेच्या कामाची जबाबदारी मजवर टाकण्यात आली.
ही संस्था ता. ४-९-१९२८ रोजी रजिष्टर झाली ती सोलापूर येथे.
आता संस्थेचा फंड सत्तर हजार रुपये सांगली बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहे व पंचाहत्तर हजार रुपयांची स्थावर मिळकत आहे.
सध्या संस्थेतील प्राथमिक शाळेत २२५ विद्यार्थी शिक्षण घेत असून अनाथ आश्रमात २५ विद्यार्थी धर्मशिक्षण घेत आहेत.
महाराजांच्या उपदेशाने प्रेरित झाला नाही असा माणूस मिळणे अशक्यच ! ____ महाराज नेहमी संयमाचा आग्रह धरीत. व्रताचरणाबद्दल त्यांना अत्यंत जिव्हाळा वाटे. त्यांच्या उपदेशाप्रमाणे कवळाणा येथे सौ. कस्तुरबाई यांनी दुसरी प्रतिमा धारण केली.
पुढे बारामती येथे मी व श्री. चंदुलाल श्राफ, तलकचंद शहा, वकील, फलटण, श्री. तुळजाराम चतुरचंद, बारामती यांना उपदेशामृताने दुसरी प्रतिमा घेवविली.
याप्रमाणे महाराजांनी आपल्या वाणीने व निष्कलंक चारित्र्याने समाजापुढे आदर्श ठेऊन समाज संघटित केला.
अज्ञानाला बळी न पडणारे सविवेक आत्मबळ
रावजी हरिचंद शहा, मोडनिंब
प. पू. आचार्यश्रींचे शुभागमन आमचे शांतिबागेत मोडनिंब येथे झाल्याने आम्हा सत्र श्रावकजनांना 'परम आनंद झाला. काही दिवसांनंतर पूज्यश्रींच्या घशामध्ये दुखण्यास सुरवात झाली व ते दुखणे आटोक्यात न आल्यामुळे सर्व भक्तगणास चिंता वाटू लागली. सोलापूरहून श्री. ब्र. जीवराज गौतमचंद, श्री. शेठ सखाराम देवचंद, श्री. शेठ वालचंद देवचंद आदी बरेच जन सोलापूरहून मोडनिंबला आले. येताना सोलापूरच्या ख्यातनाम डॉक्टरांनाही सोबत आणलेच होते. डॉ. महाशयांनी तपासल्यानंतर 'माझे मते हा
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org