________________
१६४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
आचार्यश्रींना केली. महाराजांनी काहीही उत्तर दिले नाही. सायंकाळी सर्व संघासहित आचार्यश्री गोमटे - श्वरासमोर सामायिकासाठी जाऊन बसले. दुसरे दिवशी मैसूरचे राजे विंध्यगिरीवर पोहोचल्यावर त्यांनी महाराजांना प्रणाम केला व आशीर्वाद ग्रहण केला. अशा रीतीने श्रावकांच्या काल्पनिक संकटाचे महाराजांनी प्रत्यक्ष आचरणाने निराकरण केले.
२.
२. नागपूर येथे शुभागमन व पवित्र दर्शन
पूज्य महाराजांचे सम्मेद शिखराच्या यात्रेनिमित्त १९२८ मध्ये नागपूरला संघसहित आगमन झाले. सर्व कोर्टकचेऱ्या तीन दिवस बंद होत्या. महाराजांनी गावाबाहेर मुक्काम ठेवला होता. त्या स्थानाचे शांतिनगर हे नाव अजून चालू आहे. नागपूरमधील ते पहिलेच नामांकित नगर होय. त्यावेळी संघात ५०० श्रावक व श्राविका होत्या. श्री. सेठे पूनमचंदजी घासीलालजी जव्हेरी हे संघपती होते. त्यांची तीनही मुले गेंदमलजी, दाडिमचंदजी व मोतीलालजी (सध्याचे श्री पू. १०८ सुबुद्धिसागर, धर्मसागर आचार्यांच्या संघात आहेत ) संघात अविरत श्रम करीत. नागपूरच्या मुक्कामात संघपतींना तीन लाख रुपये नफा झाल्याची तार आली. त्यामुळे शिखरजीला पंचकल्याणिक प्रतिष्ठा महोत्सव करण्याचा निश्चय झाला. त्या काळी रु. २०,००० ची पट्टी ( वर्गणी ) करण्यात आली व संघपतींना चांदीच्या पत्र्यावर मानपत्र अर्पण करण्यात आले.
त्यावेळी १९२० साली झालेल्या काँग्रेस एवढा मंडप उभारला होता. एवढा मोठा संघ लोकांना प्रथमच दिसत होता. व त्यामुळे लोकात उत्साहाचे भरते उमाप होते.
दर्शनाने धन्यता
जैन मुनी हे चालते फिरते सिद्ध असतात या अर्थाचे वाक्य शास्त्रांतरी वाचले, त्याचे प्रतीक पूज्य आचार्यांच्या दर्शनाने पाहावयास मिळाले. भक्तिभावाने मस्तक नमविण्यामध्ये धन्यता वाटली.
पूज्य आचार्य श्री शांतिसागर महाराजांचे विचक्षण द्रष्टेपण श्री शाह गुलाबचंद खेमचंद जैन, सांगली
इ. स. १९२६ सालची गोष्ट. प. पू. आचार्य श्री शांतिसागर मुनि महाराजांचा मुक्काम नांदणी ( कोल्हापूर ) येथे होता. माळभागावरील गुंफेत त्यांचे वास्तव्य होते. सहज त्यांची नजर समोर गुरे राखत हिंडणाऱ्या मुलावर गेली. चौकशी अंती ती मुले जैन समाजाचीच असल्याचे आढळून आले.
महाराजांचे विचारचक्र फिरू लागले. दृश्य अत्यंत हृदय पिळवटून टाकणारे भासले. काय ? हा प्रश्न त्यांना भेडसावू लागला. आणि त्यांच्या मनाने घेतले.
Jain Education International
धर्माचे नंदादीप सतत प्रज्वलित ठेवू पहाणाऱ्या त्यागींना ते धर्म रक्षणारी भावी पिढी वाया गेली तर धर्माचे व समाजाचे यातून मार्ग काढण्यासाठी एक अनाथ छात्राश्रम असावा असे
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org