________________
१६६
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ कॅन्सर आहे व त्यावर शस्त्रक्रिया वगैरे इलाज करावा' असा सल्ला निदान करून दिला. ब्र. जीवराज गौतम-- चंदांनी ही गोष्ट एकांतात महाराजांचे कानी घातली व त्यांनी हा असाध्य दुर्धर रोग असल्यामुळे सल्लेखना घ्यावी असे सुचविले. परंतु प. पू. महाराजांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व म्हणाले, “माझा जीव म्हणजे काही झाडावरचे पाखरू नव्हे. माझी खात्री आहे, माझा आजार कॅन्सर नव्हे. केव्हा सल्लेखना घ्यावी हे मी चांगले जाणतो."
आणि आश्चर्य की १५ दिवसांच्या वनस्पती-उपचाराने पूज्य महाराजांचे स्वास्थ्य उत्तम झाले.. नंतर दोन महिन्यांचे वास्तव्य होऊन महाराजांचा विहार बारामतीकडे झाला. विहार करण्यापूर्वी त्यांना महिन्यापासून कंबरेत दुखणे असल्यामुळे दोघे धरून आहारास उभे राहावे लागे. एवढी अशक्तता होती. परंतु विहाराचे दिवशी एकाकी कोणाचेही आधाराशिवाय ते तब्बल दोन मैल चालत गेले !
केवढे आत्मिक बल ! केवढा आत्मविश्वास !!
अचूक निमित्तज्ञान आनंदीलाल जिवराज दोशी, फलटण
आम्ही म्हसवडहून आ. महाराजांच्या संघाबरोबर दहिवडीमार्गे फलटणला येत होतो. दहिवडीच्या पुढे ४-५ मैलांवर पू. महाराजांचा आहार झाला होता. सामायिक आटोपल्यानंतर महाराजांचे प्रवचन होणार होते. परंतु सामायिक झाल्याबरोबर महाराजांनी आम्हास राहुट्या सोडून ताबडतोब सर्व सामान आटोपून पुढे जाण्यास सांगितले, व महाराजांचा विहार पुढे चालू झाला. आम्ही गडबडीने सर्व सामान घेऊन २-३ फलाँग गेलो नाही तोच मोठे वादळ झाले. आम्ही महाराजांच्या सांगण्याप्रमाणे वागलो नसतो तर वादळाच्या फेऱ्यात सापडलो असतो. यावरून महाराजांचे निमित्तज्ञान किती अचूक होते हे प्रत्यंतरास येते. स्वच्छ अंतःकरणाच्या दर्पणामध्ये वस्तुमानाचे प्रतिबिंब पडावे ह्या निसर्गाच्या नियमाचे प्रत्यंतर आहे.
निर्णय तो निर्णय केवलचंद धनजीभाई शहा, म्हसवड
श्री. ध. शेठ तलकचंद कस्तुरचंद, बारामती यांनी कुंथलगिरी येथे महाराजांकडे जाऊन संघपती बनून बारामतीला प्रतिष्ठा महोत्सवासाठी व सम्मदेशिखरजी वगैरे तीर्थधामांची यात्रा करविण्याचा आपला संकल्प प्रगट केला. परंतु बारामतीची प्रतिष्ठा आटोपल्यानंतर बराच उहापोह होऊन समजूत घातल्यानंतरही कोणी संघपती होण्यास पुढे होऊ शकले नाही. महाराजांनी माघारी बाहुबलीस फिरण्याचा निर्णय घेतला. नंतर पुष्कळांनी तयारी दाखविली. पण महाराजांचा निर्णय वज्रलेप होता. वाटेत कुंडलक्षेत्री जातांना
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org