________________
स्मृति - मंजूषा
स्त्रीला मुक्ती का नाही ? (पूर्ण समाधान )
श्री. श्रीमतीबाई कळंत्रे अक्का, श्राविकाश्रम, मुंबई
प. पू. महाराजांचे नाव परमतपस्वी म्हणून गाजत होते. त्यांनी कुदेवतादिकांच्या पूजेचे मिध्यात्व घालवून लोकांना धर्माकडे वळविले. 'देवीच्या कृपाप्रसादाने भाग्य उघडते हे निखालस खोटे असून पूर्वीचे पुण्य आता कामी येते. तिला बलि वगैरे देऊन नवसाचे प्रयोजन काय ? प्रत्येक आपल्या कर्मानुसार सुखदुःख भोगतो. मानव किंवा देव निमित्तमात्र असतात.' अशाप्रमाणे नवस, बली आदि मिथ्या रूढींपासून समाज पराङ्मुख केला. अशा उपदेशाने आकृष्ट होऊन १९१८ साली नसलापुर येथे चातुर्मासाचा योग असताना दर्शनास जाण्याचे ठरविले. रेल्वे किंवा मोटारच्या सोयी थोड्या होत्या. चिखलामुळे बैलगाडी निरुपयोगी म्हणून घोड्यावर बसून जावे लागले. दोन वाजता पोहोचल्यानंतर तत्रस्थांनी पू. महाराजांना माझा परिचय करून दिला. मला पद्मपुराण वाचावयास सांगितले. तेव्हा कानडीशिवाय दुसरी भाषा महाराजांना येत नव्हती. मी त्यांना कानडी भाषेत अर्थ सांगितला. महाराजांनी आनंदित होऊन, जवळ बोलावून असाच बायांमध्ये शास्त्रवाचनाने धर्माचा प्रचार करण्याचा उपदेश दिला. मी बालविधवा असल्याने स्वामींनी ब्रह्मचर्याची प्रेरणा करून व्रत दिले. नंतर ४-५ दिवस हिंदीमध्ये अर्थ सांगण्यासाठी ठेवूनही घेतले. जाताना उपदेश दिला की, “ धर्माचा दोरा बांधून जीवनाचा पतंग आकाशात विहरू द्या. धर्म सोडू नका. हा दोरा तुटला तर पतंग वाऱ्याबरोबर झोका घेत छिन्न होईल म्हणून धर्माचा दोरा हाती ठेवून मनाचा पतंग उडू द्या." आजही तो बहुमोल उपदेश कानी गुंजतो आहे.
महाराजांबरोबर चर्चेचा योग वारंवार लाभे. एकदा मी महाराजांना प्रश्न केला, ' दिगम्बर आम्नायामध्ये स्त्रीला मुक्ती का नाही ?' महाराज म्हणाले, 'स्त्रीपर्यायच अशी आहे म्हणूनच. ' मी म्हणाले, ' पुरुषाप्रमाणे स्त्रीला पण पाच इंद्रिये व मन असूनही स्त्रीला मात्र मोक्ष का नाही ?' माझेजवळच शांतत अम्मा बसल्या होत्या. त्या म्हणाल्यात, 'मी दिगम्बर दीक्षा घेते. मला द्यावी. महाराज म्हणालेत, 'आपण घ्याल, पण मला देता येणार नाही. ' का देता येत नाही ?' मी विचारले. ' स्त्रीपर्याय असल्याने तुम्हाला नग्न दीक्षा देता येत नाही. ' पुनः कारणमीमांसा स्पष्ट करताना सांगितले, “ स्त्रियांवर पुरुषाकरवी जबरीने बलात्कार होऊ शकतो. पण पुरुषांवर स्त्रीकडून बलात्कार होऊ शकत नाही. म्हणून त्यांना दिगम्बर दीक्षेचा अधिकार नाही. " किती मार्मिक समाधान !
"
Jain Education International
१५५
"
तदनंतर जरी मी छोटीमोठी व्रते करीतच होत्ये तरीही नियमाशिवाय काही खरे नाही म्हणून त्यांनी रात्रिभोजन त्याग, नित्य देवदर्शन आदि व्रते देऊन पावन केले. जीवनामध्ये जे काही होऊ शकले तो त्यांच्या आशीर्वादाचा पुण्यप्रभाव समजते.
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org