________________
१५६
श्री. प. पू. १०८ आचार्य शांतिसागर महाराज यांनी ३-४ शतकांमध्ये बंद पडलेली श्रमण-परंपरा पुनरुज्जीवित केली. मध्यंतरी अज्ञानामुळे श्रमणाच्या आचारादिकांचे असे ज्ञानही नसल्यासारखेच झाले होते. परंतु आचार्य महाराजांनी शास्त्रांच्या मनन व चिंतनाने आपली विवेकदृष्टी समीचीन बनविली व त्यागीच्या क्रियेला समीचीन रूप कायम केले. त्यांतील काही प्रसंग त्यांची विवेकदृष्टी किती सूक्ष्म होती याचा प्रत्यय अजून आणून देतात.
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ
आचार्यश्रींच्या जीवनातील वैशिष्ट्यपूर्ण घटना
माणिकचंद वीरचंद गांधी (फलटण )
१. प्रारंभापासूनच सावध
वस्तुतः आचार्यांनी प्रथम : श्रवण बेळगोळचे भट्टारक देवेन्द्रकीर्तीजवळून क्षुल्लक दीक्षा घेतली. दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी नरनाळ ता. हुक्केरी येथे गुरुशिष्य दोघांचाही आहार झाला. आहारानंतर दाताराने संपूर्ण म्हणून दोघांच्याही समोर सव्वा सव्वा रुपया ठेवला. गुरूंनी तो स्वीकारण्याचा इषारा केला. परंतु महाराज गुरूंना म्हणाले - आम्ही धनधान्यादि परिग्रहाचा त्याग केल्यानंतर त्याचा स्वीकार का करावयाचा ? घरी असूनही आम्ही त्याचा त्याग केला. तर मग पुनः त्यास हात कशासाठी लावावयाचा ? गुरूंनी मात्र दोघांच्या समोर ठेविलेला सव्वा सव्वा रुपया उचलून घेतला. दुपारी सामायिकानंतर विहार करण्यास निघाले असताना गुरु शिष्य शांतीसागराला अमुक गावाला चला म्हणाले, तेव्हा शांतीसागर म्हणाले.
66
'तुमच्या सोबत राहाण्याने माझा संयम कसा निभणार ? आपण तिकडे जावे. मी इकडे जातो...."
२. असाही धडा दिला जाऊ शकतो
महाराजांनी त्यासंबंधी विवेकानेच जेवायला, लौकर उठा. मला गावाला
प्रथम उद्दिष्ट आहाराच्या त्यागाची कल्पनाही अस्पष्ट होती. काम घेतले, कागलला असताना उपाध्याय महाराजांना म्हणाला चला जावयाचे आहे. महाराज म्हणालेत -- ' तुला जाणे असेल तर जा. मला का उठवितोस' उपाध्याय म्हणाला ' मीच तुम्हाला जेवावयास देणार आहे. माझ्याशिवाय कोण देणार ? म्हणून उठवितो. '
'आज मला उपवास आहे ' महाराज म्हणाले.
नंतर उपाध्याय श्रावकाच्या घरी गेला. आणि महाराजांना उपवास आहे. म्हणून मला जेवावयास द्या म्हणाला. उपाध्याय जेवून गावाकडे गेला, नंतर दोनप्रहरी श्रावक मंडळी गावात जमली व महाराजांना उपवासाचे कारण विचारले.
' तुम्ही शुद्धीकरिता पाणीच दिले नाही तर मी आहाराला कसा निघणार ? '
L
आपण तर उपाध्यायाला मला उपवास आहे म्हणून सांगितलेत. '
"
आम्हाला उपाध्यायच जेवावयास देतो म्हणाला; तुम्ही का देत नाही ?
"
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org