________________
१५४
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ दिगंबराला दिगंबरमूर्तीचा अपार भक्तिभाव
श्रीकुंथलगिरी क्षेत्रावर एक विशाल जिन मूर्ति स्थापन व्हावी असे भाव १९५३ चे चातुर्मासात व्यक्त झाले. परंतु त्यांना ते याच देही पाहण्याचा योग आला नाही. सल्लेखनेचे वेळी म्हैसूरजवळ एका खेडेगावी नदीचे काठी १८ फूट उंचीची बाहुबलीची मूर्ति आहे. आजूबाजूला जैन वसती नाही. पाण्याने वाहून मूर्ति खंडित न व्हावी म्हणून तिची योग्य व्यवस्था व्हावी अशी वर्तमानपत्रात चर्चा होती. ती वार्ता कानी पडताच त्यांनी रावजी देवचंद व हिरालाल काला यांना तातडीने पाठवून कसेही करून ती मूर्ति ट्रकमध्ये घालून आणा असा उपदेश दिला. अंतर्बाह्य दिगंबरत्व हा त्यांनी विकल्पाचा विषय ठेवला नाही. परंतु तेथील पंचांनी 'पावसाळ्यात मूर्ति नेऊ नका. पावसाळ्यानंतर आम्ही महाराजांच्या इच्छेनुसार कुंथलगिरीला पोचवू' सांगितल्यामुळे ते मूर्तीचा फोटो घेऊन सल्लेखनेच्या २६ व्या दिवशी परत आले. दोन प्रहरी फोटो व पंचांचे पत्र महाराजांना दाखविले. तेव्हा त्यांनी तो फोटो हाती घेतला, तीनदा मस्तकाला लावला. डोळ्यातून सहज आनंदाश्रु उभे झाले. जे भावनेने उद्गारले. भगवंताचे दर्शन झाले धन्यता वाटते ! प्रत्यक्ष परोक्ष एकरूप दिगंबरत्वाची मनोमन प्रतिष्ठा होती. मूर्ति येथे केव्हा तरी विराजमान होईल हे सहजोद्गार निघाले. भविष्यवाणी खरी ठरली.
संयमाबद्दल सदा सावधानता
सल्लेखना धारण केल्यानंतर पाचसहा दिवसांनी त्यांनी मला व स्व. माणिकचंद वीरचंद यांना एकान्ती बोलवून घेतले व म्हणाले 'मी सांगतो ते कराल ना!' 'आम्ही आपल्या आज्ञेच्या विरुद्ध कसे वागू' आम्ही उत्तरलो. “आता यम सल्लेखना घेतलेली आहे. काही दिवसांनी स्वर्गवास होईल. तेव्हा हे शरीर न जाळता जवळच्या नदीकिनारी ठेवून द्या" महाराज म्हणाले, मी म्हणालो-'सारा सगळा मुनीसंघ भोवती असतांना असे कसे घडू शकेल ? आम्हा श्रावकांना हे कसे उचित होईल ? ' असे म्हणताच ते म्हणाले "ठीक आहे. परंतु जेथे दहन होईल. ती जागा तरी जीवजन्तुविरहित असेल याची मात्र काळजी घ्या" अशी होती प्राणिरक्षा संयमाबाबत सावधानता!
संयममूर्ती आचार्यांच्या चरणी त्रिवार अभिवादन !
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org