________________
१५०
आ. शांतिसागरजी जन्मशताब्दि स्मृतिग्रंथ हे सर्व करण्याऐवजी त्यांचेबरोबर केवळ सहभोजन करण्याने त्यांचा कसा काय उद्धार होणार हे आम्हाला समजत नाही. आमच्या अंतःकरणात त्यांच्या संबंधी अपरंपार दयाभाव आहे. १०. निश्चय व व्यवहार
प्रश्न-व्यवहारापेक्षा निश्चयाकडे अधिक प्रवृत्ती होत असल्याचे आजकाल आढळते ते कितपत योग्य आहे ?
__आचार्यश्री-व्यवहार पुष्पाप्रमाणे आहे. वृक्षावर प्रथम पुष्प येते. त्या पुष्पातूनच फळ अंकुरित होते. जेव्हा फळ पूर्ण विकसित होते तेव्हा पुष्य नष्ट झालेले असते. हे जसे, तसेच प्रथम व्यवहारधर्म होतो. त्यातून निश्चयधर्म अंकुरित होत जातो. निश्चयाची पूर्णता झाली म्हणजे व्यवहार आपोआप गळून पडतो. ११. शासन-पुरस्कृत जीवहिंसा
प्रश्न-महाराज, आजकाल अन्न-उपज व पीक संरक्षणासाठी अनेक प्रकारच्या पशुपक्ष्यादिकांची हिंसा करण्यास शासन मदत करते-उत्तेजन देते ते कितपत बरोबर आहे ?
आचार्यश्री-आमच्या दृष्टीने ते सर्वथा चूक तर आहेच, पण आत्मघातकीपणाचेही आहे. वानर वगैरे प्राणी केवळ भीती दाखविण्याने पळून जातात. त्यासाठी त्यांना ठार मारण्याचे प्रयोजन काय ? निसर्गनिर्मित फळांफुलांवर जगणारे हे प्राणी अल्पभोजी असतात. मानवाप्रमाणे संग्रह करण्याची त्यांची प्रवृत्ती नाही. ज्याअर्थी त्यांना जीव आहे त्याअर्थी मानवाप्रमाणेच त्यांना अन्नाची जरूर लागणारच, त्याशिवाय त्यांनी जगावे कसे?
__ आज शासन आणि लोक त्या निसर्ग-निर्मित पशुपक्ष्यांचा जो निर्दय संहार करीत आहेत त्यामुळेच अन्नधान्याची निपज कमी होऊ लागली आहे. पूर्वी हरिणादिक पशु शेतातील कोवळे अंकुर भक्षण करीत त्यांच्या तृप्ततेतून जी शुभ भावना आशीर्वाद रूपाने प्रतीत होत असे त्यामुळे अमाप धान्य निर्माण होत असे. आता तेही नाहीत व धान्य-उपजही नाही. निसर्ग जे काही धान्य, फळे वगैरे निर्माण करते त्यात पशुपक्ष्यांचाच वाटा अधिक असतो.
__ आजही हा पशुपक्ष्यांचा संहार थांबविला तर अन्नोत्पादन इतके वाढेल की लोकांना ते पुरून पुष्कळसे उरेल देखील; पण जीवांचा संहार असाच चालू राहिला तर मात्र भूकंप, नापिकी, टोळधाड, अतिवृष्टी, अनावृष्टी ही संकटे सारखी येतच राहतील व मानव कधीही सुखशांतिपूर्वक जीवन व्यतीत करू शकणार नाही. १२. सुखप्राप्तीचा उपाय
प्रश्न-सुखप्राप्तीचा खराखुरा उपाय काय ? ___ आचार्यश्री-श्रीकृष्णाचे वडील बंधू बलराम ( वासुदेव ) हे गतजन्मी अत्यंत कुरूप आणि बुद्धिहीन होते, शिवाय निर्धन देखील. त्यामुळे ते अत्यंत तिरस्कारपात्र बनले होते. त्यांनी सद्गुरुचरणांचा आश्रय
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org