________________
स्मृति-मंजूषा
१५१
घेतला, उपाय विचारला. सद्गुरूंनी 'अहिंसामय तपस्या' करण्यास सांगितले. त्याप्रमाणे त्यांनी उग्र तपश्चर्या केली. फलस्वरूप त्यांना विद्या, कला, वैभव, सौन्दर्य या सर्वांनी सम्पन्न असा हा वसुदेवाचा जन्म प्राप्त झाला. संयम तथा व्रतपालनासाठी दैवापेक्षा पुरुषार्थावरच अधिक भर देणे प्रशस्त आहे. सुखप्राप्तीचा उपाय इन्द्रियनिग्रह आणि संयमपालन हाच आहे.
१३. पुरुषार्थ आणि दैव
प्रश्न- पुरुषार्थ सर्वस्वी आपल्या स्वाधीन आहे काय ?
आचार्यश्री - जेव्हा कर्मोदयाचा वेग अति तीव्र असेल तेव्हा तो ओसरेपर्यंत शान्त राहिले पाहिजे. मात्र तो ओसरताच पुरुषार्थ केला पाहिजे. आम्ही भोजग्रामच्या वेदगंगा-दूधगंगेच्या संगमात लहानपणी पोहत असू. पुराच्या वेगवान धाराप्रवाहात सापडलो म्हणजे स्वस्थपणे थोडे अंतर वहात जात असू; पण प्रवाहाचा वेग किंचित् कमी झालेला दिसताच जोरात हातपाय चालवून किनारा गाठीत असू. ह्याप्रमाणेच जेव्हा पापोदयाचा वेग जोरदार असेल तेव्हा न घाबरता स्वस्थ पण सावध राहावे व योग्य संधी येताच संयमपालनाचा पुरुषार्थ करून दैवावर मात करावी. शास्त्रांच्या स्वाध्यायाने बुद्धी चौकस व पुरुषार्थवादी बनते. म्हणून मासळी ज्याप्रमाणे अथांग समुद्रात स्वच्छंद विहार करून प्रसन्नतेने आपले जीवन सुखसम्पन्न करते. त्याप्रमाणे जीवाने शास्त्रसमुद्रात स्वछंद विहार करून आपला मार्ग सुकर केला पाहिजे. अखंड स्वाध्याय माणसाला पुरुषार्थवादी करण्यास व ठेवण्यास मदत करतो.
१४. कर्मभूमीचा अर्थ
प्रश्न – कर्मभूमीचा अर्थ काय ?
आचार्यश्री - सामान्यतः कर्मभूमीचा अर्थ — जेथे असि, मसि, कृषि, वाणिज्य, शिल्प व विद्या ह्या षट्कर्मांच्या द्वारे उपजीविका होते ती कर्मभूमी असा केला जातो; पण याहीपेक्षा अधिक चांगला अर्थ असा की, 'जेथे कर्मक्षय संभवतो ती कर्मभूमी ' असा घेतला जाणे अधिक प्रशस्त वाटते.
१५. दिगंबर जैन धर्म
प्रश्न -- दिगम्बर जैन धर्माला ओहोटी लागल्यासारखे वाटते असे का व्हावे ?
आचार्यश्री - दिगम्बर जैन धर्म कठीण आहे. आजकाल लोक ऐहिकतेकडे झुकत चालले आहेत. मोक्ष आणि तो मिळवण्याचे मार्ग परिश्रम, संयम, तप वगैरे प्रक्रियेमुळे खडतर भासतात. इतर धर्मात हा प्रकार नाही. अन्यत्र साधु लोक स्त्री वगैरे परिवारासह राहातात, परिग्रह बाळगतात, खानपानाची बंधने ठेवीत नाहीत.
दिगंबर मुनी शहाण्णव दोष टाळूनच भोजन करतील. प्राण गेला तरी घेतलेले नियम व व्रते सोडणार नाही. आरंभ व परिग्रहांनी ते रहित असतात.
स्वामी समंतभद्रांनीही ह्याची चर्चा पूर्वी केली आहे. ते म्हणतात ' जिनेन्द्र - शासन ' दया, दम, त्याग, समाधि आदिकांच्या प्रतिपादनामुळे अद्वितीय ठरला आहे, तथापि जनसामान्याचे त्याकडे आकर्षण
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org