________________
स्मृति - मंजूषा
१४९
रूप, धन, वैभव, कुटुंब इ. रागद्वेषांच्या उत्पत्ती - साधन सामुग्रीच्या सद्भावात मनःशांती असंभव असते. मनाची प्रसन्नता ही आत्म्याच्या शांतीची पार्श्वभूमी होय. दुसरे विषयभोगासक्तीने मनोवृत्ती मलीन होते. तिसरे, मरणाचे वेळी सर्व बाह्यसामुग्री येथेच राहाते. केवळ आपले पापपुण्यच तेवढे आत्म्या- बरोबर येते. ह्यावरून ह्या बाह्य सामग्रीची आसक्ती अनावश्यक सिद्ध होते.
७. शिक्षणसंस्थेपासून अपेक्षा
प्रश्न- आपल्या समाजात अनेक धर्मशिक्षणसंस्था निर्माण होत आहेत व कार्य करीत आहेत ह्याबद्दल आपले अभिमत काय आहे ?
आचार्यश्री-दुसऱ्यांची मुले संवर्धित करून त्यांना लौकिक शिक्षण देण्यात व ऐहिक सुखसाधनसंपन्न बनविण्यात धर्म वा संस्कृती - संरक्षण असे काय साधले ! हे तर दाईचे काम झाले. हे कार्य तर सरकारही करीत आहे. तुमचे वैशिष्ट्य काय राहिले ?
प्रश्न - काय असावे असे आपणास वाटते ?
आचार्यश्री - संस्थेतून शिक्षण घेऊन निघालेल्या विद्यार्थ्यांमध्ये संयम - धारणेबद्दल आदर आणि आस्था निर्माण झाली असल्याचे आढळले -प्रत्ययास आले पाहिजे. त्या सर्वांनी त्वरित धारण केलेच पाहिजे असे नाही – पण रत्नत्रयधारी त्यागी, व्रती, संयमी व्यक्तीबद्दल अनुराग, प्रेमादर, भक्ति, श्रद्धा तरी त्यांचे ठायी निर्माण झाली पाहिजे असे आम्हास अभिप्रेत आहे - अपेक्षित आहे. रत्नत्रयधारकांची परिचर्या सेवा, वैयावृत्य ह्यात त्यांना आनंद-कृतार्थता - कर्तव्यदक्षता प्रतीत झाली पाहिजे. अन्यथा ह्या शिक्षणसंस्थांचे प्रयास व्यर्थ आहेत असे धर्म व संस्कृति - संरक्षणाच्या दृष्टीतून म्हणणे प्राप्त होईल.
८. विश्वाचे नंदनवन
प्रश्न- विश्वाचे नंदनवन केव्हा व कसे होईल ?
आचार्यश्री - फार मोठ्या योजना व (भौतिक) सुखसोयी वाढवून त्याचे नंदनवन होणार नाही. त्यासाठी मानवमात्राने हिंसा, परस्त्रीलंपटता, असत्य, चोरी आणि अधिक तृष्णा ह्यांचा त्याग केला पाहिजे. - यानंतर येणारी सुख शांती हेच नंदनवन समजावे.
९.
अस्पृश्योद्धाराचा मार्ग
प्रश्न - महाराज अस्पृश्योद्धाराचा खरा मार्ग कोणता ?
आचार्यश्री- तुम्ही लोक बंगला - महाल - भवनादिकात रहाता, पण त्यांना नीट झोपड्या देखील उपलब्ध करून देत नाही. जीवनाचा उद्धार पापांच्या त्यागाने होतो. त्यांना मद्य, मांस व मधूचा त्याग करायला प्रवृत्त करा, त्यांची गरिबी दूर करा, गुन्हेगार प्रवृत्तीपासून त्यांना दूर सारा शिकारजीवहिंसा सोडवा.
Jain Education International
For Private & Personal Use Only
www.jainelibrary.org