________________
एकादश गणधर व क्षात्र शिष्यगण.
प्रकरण नववें. एकादश गणधर व क्षात्र शिष्यगण.
त्रैकाल्यं द्रव्यपट्कं सकलगणितगणाः सत्पदार्थान चैव । विश्वं पंचास्तिकायव्रतसमितिविदः सप्ततत्वानि धर्मः । सिद्धे मार्गस्वरूपं विधिजनितफलं जीवषदकायलेश्या । पतान्यः श्रद्धदाति जिनवचनरतो मुक्तिगामी सभव्यः ॥
केवलज्ञानप्राप्ति झाल्यानंतर मागील प्रकरणांत सांगितलेल्या जिनशासनाचा प्रचार करण्यासाठी महावीरस्वामी विदारावर निघाले. संसारपरिभ्रमणकारक अष्टकमीचा उच्छेद त्यांनी केला होता. केवलज्ञानामुळे लोकालोकांचे पूर्णस्वरूप ते ओळखीत होते. आपणाला जो अनुभव आला तोच इतर भव्य जीवांनाहि यावा म्हणून तसा उपदेश देण्यासाठीच ते परम कारुण्यभावानें आतां विहार करीत होते. गेली बारा वर्षे जो संचार त्यांनी केला तो स्वात्मोन्नतीसाठी होय. आतां मोक्षपाती होईपर्यंत त्यांनी जो विहार केला तो परोपकारासाठी होय. मागील विहाराप्रमाणेच या विहारांतहि ते चातुर्मासांत एके ठिकाणीं वास्तव्य करीत. पूर्व विहारांत त्यांना तपश्चय करावयाची असल्यामुळे अनेक उपसर्ग सहन करावे लागले होते; पण केवलवानप्राप्ती झाली तेव्हां त्यानीं सर्व कर्माचा क्षय केलेला असल्यामुळे मुखदुःखात्मक फलें भोगणे आतां त्यांना आवश्यक नव्हते. आतां त्यांना अव्याबाध सुखांत निर्विकारपणे राहूनच आयुकर्म संपवा - वयाचे होते. हरिवंशपुराणांत जिनसेनाचार्यांनी लिहिल्याप्रमाणें काशी, कौशल, कोसल, कुसंध्य, अवष्ट, साल्व, त्रिगर्त, पंचाल, भद्रकार, पाटच्चर, मौकमत्स्य, कनीय, वृकार्य, सूरसेन, कलिंग, कुरुजांगल, कैकेय, अत्रेय, कांबोज, वाल्हीक, यवनवृति, सिंधु, गांधार, सौवीर, सूर, भीरु, दशेरूक, वाढवान, भारद्वाज, क्वाथतोय, जार्ग, काणे, प्रच्छाल, वगैरे अनेक देशांत विहार करून महावीर - स्वामींनी धर्मप्रचार केला.
याप्रमाणे विहार करीत असतां ते अशा एका ठिकाणी गेले कीं, जेथें बरेच ब्राह्मण यज्ञसमारंभासाठी जमले होते. तेथें इंद्रानें अग्रभागी दिलेला श्लोक ( ८१ )
६