________________
महावीरचरित्र
विद्याध्ययनांतच रत असत. ते सम्राट श्रेणिकाबरोबर महावीरतीर्थकरांच्या समवसरणांत गेले होते. तेव्हांच त्यांना वैराग्य उत्पन्न झाले. ते गादीचे वारस युवराज असल्यामुळे त्याचे हे वळण कोणालाहि आवडेना. तेव्हां त्यांनी मुनिदक्षिाच घेऊन टाकली. बरीच वर्षे तपश्चर्या करून शेवटी त्यांनी मोक्षप्राप्ती करून घेतली.
श्रोणिकाचे दुसरे पुत्र बारिण हेहि मुनी झाले. तारुण्यावस्थेतच त्यांना वैराग्य प्राप्त झाले. त्याचे दर्शन च चारित्र फारच उच्च दर्जाचे होते. कुमारवारिषेण हे राजवाडा सोडून रोज जंगलांत जाऊन सामायिक करीत असत. एकदां प्रोषधोपवास घेऊन ते जंगलांत रात्री सामायिक करीत बसले होते. राजगृहीतील विद्युत् नांवाचा एक गृहस्थ दत्तशेटच्या घरांतून एक रत्नहार चोरुन भाणून वेश्येच्या घरी घेऊन चालला होता; ते कोतवालाने पाहून विद्युतचा पाटलाग केला. विद्युत गावाबाहेर पळत सुटला. वाटेत ध्यानस्त बसलेला इसम पाहून त्याचे अंगावर तो हार टाकून विद्युत पुढे पळून गेला. राजदूत पाठलाग करीत येतच होते. त्यांनी हार घेऊन ध्यानस्थ बसलेला इसम पाहिला व तोच चोर म्हणून त्याला पकडून नेले. या घोर अपराधाबद्दल त्या इसमाला फाशीची शिक्षा द्यावी, असा हुकूम सुटला. त्याप्रमाणे वारिषेण राजपुत्रालाच फांसाकडे नेण्यांत आले; पण वारिषेणने काही प्रतिकार केला नाही. त्याच्यावर उगारलेली तलवार पुष्पहार झाली. तेव्हां चांडाळाला विचार पडला व अधिक चौकशी झाली. फांसावर देण्यास काढलेला इसम वारिषेण राजपुत्र आहे असे पाहून सर्वाना अचंबा वाटला व भीतिहि उत्पन्न झाली. पण वारिपेणानी कोणालाहि शासन केले नाही, उलट आपणच मुनिदीक्षा घेऊन राजगृहनगरी सोडून चालते झाले. महावीरतीर्थकरांचे समवसरणांत वारिषण मुनीहि गेले होते. इतरांना मोक्षमार्गावर आणण्यांत ते फार चाणाक्ष होते व स्वतःहि मोक्षाला गेले.
राजगृहनगरीच्या या राज्यघराण्यांतील संतति एकापेक्षा एक चारित्रवान जिच्यामुळे निघाली त्या चेहटनेचे माहेर तर जैनधर्मानुयायी फार पूर्वीपासून होते. चेटक राजाच्या घराण्यांर्ताल संततीहि धर्माद्धारकच निघाली. तीर्थकरमाता त्रिशलादेवी हि चेटकराजाचीच पुत्री. त्याची सर्वात लहान मुलगी चंदनाहि अर्जिकांची नायिका म्हणून जैनशास्त्रांत प्रख्यात आहे. एकदा ती बगि
(८६)