________________
महावीरचरित्र
नैगमन होय. अस्तित्व भावनेस न सोडता हें जग आपापल्या भावनेनुसार चाललें आहे; पण अस्तित्वभावच मुख्य धरून सर्व जगाकडे एकाच दृष्टीनें पाहप्यास संग्रहनय शिकवितो. त्याच सत्तेस प्रत्येक वस्तूमध्यें भिन्नाभिन्न रूपानें पाहून वागण्यास व्यवहार-नय शिकवितो. या भिन्न भिन्न वस्तूंच्या तात्कालिक स्वरूपाकडेच तेवढे ऋजुसूत्रनय लक्ष देतो. लिंग, संख्या वगैरे भेद शब्दनय दाखवितो. या भिन्न भिन्न वस्तूकडे संज्ञेच्या दृष्टीने पाहण्यास समभिरूढनय शिकवितो. वस्तु एकाच शब्दानें नेहमीं वाच्य होत नसते. अवस्थांतरानुसार नांवेंहि बदलतात ही गोष्ट एवंभूतनय दाखवितो. या सात नयांचा योग्य उपयोग केल्यास सम्यग्ज्ञान होते; पण विपरीत उपयोगानें मिथ्यात्व उत्पन्न होतें. नैयायिक व वैशेषिकांनीं नैगमनयाचा, सांख्य व अद्वैत्यांनी संग्रहन्याचा, चार्वाकांनी व्यवहारनयाचा, बौद्धांनी ऋजुसूलनयाचा आणि शब्द, समभिरूढ व एवंभूत नयांचा वैय्याकरणी वगरेन दुरुपयोग किंवा एकांतिक उपयोग करून मिथ्यात्व वाढविले आहे व तत्त्वज्ञानांत घोटाळा माजविला आहे. या एकांतिक उपयोगासनयाभास म्हणतात. कारण ते कांहीं अंशांनी कबूली देऊन इतर अंशांचा पूर्ण निषेध करतात. पण नयाचा उपयोग एखादा अंश ग्रहण करून बाकीच्या अंशाबद्दल उदासीन राहूनच करावयाचा असला तरी ते इतर अंश विचारांत घ्यावे लागतात.
याप्रमाणें हें वीरशासन आहे. ते येथवर थोडक्यांत सांगितलें आहे. प्रारंभींच्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे जिनशासन गभीर आहे व स्याद्वाद हाच त्याचा विशेष आहे. त्रैलोक्यनाथ महावीराच्या या शासनाचा नेहमीं विजयच होणार. कारण तें सावैगिक, परिपूर्ण व शुद्ध आहे.
| g
( ८० )
}