________________
महावीरशासन
येतां एका दृष्टीनें व सर्व दृष्ट्या एकेक गुणधर्माचा सात तऱ्हेने केलेला काल्पनिक विधिनिषेध म्हणजे सप्तभंगी होय. कोणत्याहि वस्तूचा विचार अपेक्षेनें २ करावयाचा असतो. द्रव्य, क्षेत्र, काल व भाव या त्या चार अपेक्षा होत. ही चर्चा करतांना पुन्हां स्वकीय चतुष्टय व परकीय चातुष्टय अशा दोन दृष्टीनें विचार करावा लागतो. स्तभंगीचा स्यादस्ति हा पहिला प्रकार होय. हे अस्तित्व स्वकीय चतुष्टयाच्या अपेक्षेने ठरविण्यांत येतें. स्यान्नास्ति हा दुसरा प्रकार होय. हैं नास्तित्व वरील वस्तूंचेंच पण परकीय चतुष्टयाच्या अपेक्षेनें ठरविण्यांत येते. तिसरा प्रकार स्यादस्ति च नास्ति च होय. स्वचतुष्टयानुसार आहे पण परचतुष्टयानुसार नाहीं असा एकसमयावच्छेदे करून निकाल या प्रकारांत ठरविण्यांत येतो " स्यादव कव्यम् ' हा चौथा प्रकार होय. एकदम स्वकीय व परकीय चतुष्टयानुसार एकच उत्तर देणे अशक्य होय असे हा प्रकार दाखवितो. स्यादस्तिचावक्तव्यम् हा पांचवा प्रकार होय. स्वकीय चतुष्टयानुसार वस्तु आहे पण स्वकीयपरकीय चतुष्ट्यानुसार सांगणे अशक्य आहे ही गोष्ट हा प्रकार दाखवितो. साहवा प्रकार स्यान्नास्तिचावक्तव्यम् हा होय. परकीय चतुष्टयानुसार नाहीं व स्वकीय चतुष्टयानुसार सांगणें अशक्य ही गोष्ट हा प्रकार दाख वितो. स्यादस्तिनास्तिचावक्तव्यम् हा सातवा प्रकार होय. स्वकीय व परकीय चतुष्टयानुसार क्रमाने अस्तित्व व नास्तित्व सांगणे व एकदम तीं दोन्ही सांगणे अशक्य आहे ही गोष्ट हा प्रकार दाखवितो. अनेके अन्ताः धर्माः यस्मिन् भावे सः अयं अनेकान्तः । ज्यामध्ये अनेक धर्माचा उल्लेख केला जातो त्यास अनेकान्त म्हणतात, म्हणून स्याद्वादास अनेकांतवाद असेंहि नांव आहे.
नय व प्रमाण या दोन अपेक्षेनेंहि प्रत्येक वस्तूबद्दल चर्चा करतां येते. प्रमाणापेक्षा म्हणजे सकलादेश व नयापेक्षा म्हणजे विकलादश. एखाद्या वस्तूबद्दल एकदम अभेद दृष्टीनें म्हणजे अनेक गुणधर्मीकडे किंवा पर्यायांकडे लक्ष न देता विचार करणें म्हणजे सकलादेश किंवा प्रमाणापेक्षा होय, व एखाद्या वस्तूच्या एकेक पर्यायाचा व गुणाचा अनुक्रमानें विचार करणें म्हणजे विकलादेश किंवा नयापेक्षा होय. एखाद्या वस्तूच्या कोणत्याहि पर्यायाचा किंवा गुणाचा निश्चय - ज्यामुळे होतो त्यास नय म्हणतात. नैगम, संग्रह, व्यवहार, ऋजुसूत्र, शब्द, समभिरूड व एवंभूत असे सात नय आहेत. अभेदभावाचे ज्ञान करून देणारा किंवा सामान्य धर्म निराळा व विशेष धर्म निराळा आहे असें ज्यामुळे कळतें तो ( ७२ )