________________
महावीरचरित्र
विरहदुःख, चिंता, प्रखर विषयाभिलाषा व तळमळ होय. रौद्रध्यान म्हणजे कषायतीव्रता. अर्थात् हिंसा, असत्य, स्तेय वगैर पातकांची अभिरुचि; मत्सर, हेवा किंवा कोणाचेंहि बरे न पाहवणे. धर्मध्यान म्हणजे चांगल्या व शुद्धविषयांचें चिंतन आणि शुक्लध्यान म्हणजे आत्मध्यान किंवा आत्मरति. शेवटी मुनाने समाधिमरण साधावें. अशा मरणास संन्यसन् ( सन्यासमरण) किंवा सालेखना म्हणतात. उपवास करून, कायोत्सर्ग राखून व आत्मध्यानी मन होऊन अंतकालपर्यंत देह असून विदेहावस्थेत राहणे म्हणजेच सल्लेखना होय. या संन्यसनव्रताने किंवा समाधिमरणाने उत्तम गति प्राप्त होते.
अन्त्यि , अशरण, संसार, एकत्व, अन्यत्व, अशुचित्व, आस्रव, संवर, निर्जरा, लोक, बोधिदुर्लभ व धर्म या बारा अनुप्रेक्षा होत. अनुप्रेक्षा म्हणजे भावना चितवन, विचार किंवा निदिध्यास होय. दह व तद्विषयक व्यवहार अनित्य आहेत असा विचार करणे ही अनित्यानुप्रेक्षा होय. धर्माचरणाशिवाय आपणांस दुसरा खरा आसरा नाही हे जाणणे म्हणजे अशरणानुप्रेक्षा होय. जन्ममरणांच्या अनंत फेयांमुळे हा पंपच मागे लागलेला आहे व तो दुखमय आहे असे चिंतणे ही संसारानुप्रेक्षा होय. आपण आलों एकटे, जाणार एकटें व आपल्या कर्मापुरतें आपण एकटेच जबाबदार आहोत याचा विचार करणे म्हणजे एकत्वानुप्रक्षा होय. आत्मा व देहादिक अगदी भिन्न आहेत हे ओळखणे ही अन्यत्वानुप्रेक्षा होय. देहाच्या अंमगलतेचा व पातकांच्या अनिष्टपणाचा विचार करणे म्हणजे अशुचित्वानुप्रेक्षा होय. मिथ्यात्व, कषाय, अविरति, प्रमाद व योग या पांच बंधनकारक कारणांमुळे होणाऱ्या आस्रवास दुःखमूळ समजून, सद्विचार, सदाचार व सदुच्चार राखण्यास झटणे ही आस्रवानुप्रेक्षा होय. नव्या बंधनांनी आत्मा बद्ध न व्हावा म्हणून उपाय योजणे ही संवरानुप्रेक्षा होय. नवीन बंधनकारक कमें घडत नसली तरी प्रारब्धकर्माचे भोग भोगणे बाकी असतेच. त्यांचा नाश करण्याचा उपाय योजणे ही निर्जरानुप्रेक्षा होय. हे जग अनाद्यनंत आहे व ते स्वयंभू आहे वगैरे प्रकारचा या इह लोकासंबंधींचा विचार करणे यास लोकानुप्रेक्षा म्हणतात. रत्नत्रयीस बोधी म्हणतात. ही रत्नत्रयी जीवाचा स्वभाव असला तरी वैषयिक आकर्षणामुळे ती दुर्लभ झालेली असते. ती पुन्हां प्राप्त कशी होईल किंवा जीवात्म्यांत प्रगट होईल याचा विचार करणे म्हणजे बोधिदुर्लभानुप्रेक्षा होय. . जिनद्रभगवानप्रणित दशलाक्षणिक व रत्नत्रयमय धर्मच आत्म्याचा
(७६)