________________
महावीरचरित्र
तहजीव पुग्गलाणं धम्मं दव्वं वियाणेहि ॥' माशास जसें पाणी गमनाला साहाय्यभूत होतें पण प्रेरक नसते तसें धर्मद्रव्य जीव व अजीव द्रव्यांस गमनास उदासीनपणें साहाय्य करते, प्रेरक नसतें. अधर्म द्रव्याची व्याख्या खालीलप्रमाणे आहे. 'द्रव्याणां पुद्रलादीनामधर्मस्थितिकारणम् । छायेव धर्मतप्तानामश्वादीनामिवक्षितिः ॥ ' घामेजलेल्या व उन्हाच्या तापाने पोळलेल्या जीवांच्या स्थितीस ज्याप्रमाणे सावली कारणीभूत होते त्याप्रमाणें अधर्म द्रव्य, जीव व अजीव द्रव्यांच्या स्थितीला उदासीनपणें कारणीभूत होते. त्यांच्या गतीला प्रत्यक्ष erseळा करीत नाहीं. ' अवगासदाणजोग्गं जीवादीणं वियाण आयासं । जेन्हं लोगागास अल्लोगागासमिदि दुविहं ।' जीव व अजीव द्रव्यांना अवकाश देण्यास जें योग्य आहे तें आकाश द्रव्य होय. लोकाकाश व अलोकाकाश असे त्याचे दोन भेद आहेत. पांची द्रव्यांना अवकाश देणारें तें लोकाकाश व त्याचे पालकडे असलेले अलोकाकाश. पहिले परिमित आहे तर दुसरें अनंत आहे. ' दव्वपरिवहरूवो जो सो कालो इवेह ववहारो । परिणामादि लक्खो वट्टण लक्खोय परमहो । ' जे द्रव्य जीवादि द्रव्यांचें परिणमन करण्यास सहाय्यभूत होतें तें कालद्रव्य होय. द्रव्याचे पर्याय पालटण्यास कारणीभूत होणारा समय तो व्यवहार काल व त्यांच्या वर्तनाला किंवा क्रियेला जो आधार तो परमार्थकाल होय. वेळेतील तारतम्यास परिणमन म्हणतात, व पर्यायांच्या अस्तित्वाच्या अनुभवास वर्तना म्हणतात.
जीव, अजीव, पुण्य, पाप, आसव, संवर, बंध, निर्जरा व मोक्ष असे नऊ पदार्थ आहेत. जीव म्हणजे आत्मतत्व व अजीव म्हणजे जडतत्व. शुभास्रव म्हणजे पुण्य व अशुभास्रव म्हणजे पाप असे आश्रवाचेच दोन भेद असल्यामुळे हे दोन निराळे पदार्थ मानलेले नाहीत. गुणभद्राचार्यानी म्हटले आहे ' परिणाममेव कारणमाहुः खलु पुण्यपापयोः प्रज्ञाः ॥ कायवाङ्मनः कर्मयोगः स आस्रवः । कायावाचामनेंकरून जी कर्मे घडतात तो आस्रवयोग म्हणजे बद्ध आत्मतत्वांत ज्यामुळे बरेवाईट परिस्पंदन किंवा स्फुरण होतें तो. ' आत्मप्रदेशपरिस्पन्दो योगः शुभाशुभकर्मागमद्वाररूपः आस्रवः ' कर्मपुद्गलांच्या आगमनास अनुकूल अशी जीवाची क्रिया म्हणजे आस्रव होय. ' आसमन्तात् स्रवतीति तीति आस्रवः' असें वचन आहे; तेव्हां आसव म्हणजे शुभाशुभ कर्मा द्वार होय. ' आस्रवनिरोध लक्षण: संबर: ' कर्मपुद्गलांच्या प्रवेशाचा निरोध करणें
आगच्छ
( ७२ )
F