________________
महावीरशासन
कशाला धारण करतील ? हीच स्थिति प्रत्येक आत्म्याला प्राप्त करून घ्यावयाची आहे, म्हणून सर्व भव्यजीवांना ती शक्य तितक्या लवकर प्राप्त होवो असेंच कोणीहि इच्छील.
प्रकरण आठवें.
महावीरशासन श्रीमत्परमगंभीरस्याद्वादामोघलांछनम् ।
जीयात त्रिलोकनाथस्य शासनं जिन-शासनम् ॥ केवलज्ञानप्राप्ती झाल्यानंतर प्रभु महावीरांनी दिव्यवाणीने त्रिकालाबाधित तत्वज्ञानाचा उपदेश भव्यजीवांना करण्यास सुरवात केली. त्या दिव्यवाणीचा अर्थ मानवी भाषेत करून गौतमादि गणवरांनी सांगितला. त्याचा सारांश खालीलप्रमाणे आहे. या विश्वात मूल षट् द्रव्ये आहेत ती येणेप्रमाणे-जीव, अजीव, धर्म, अधर्म, आकाश व काल. 'अवस्थान्तरं द्रवतीति - गच्छतीति द्रव्यम्'। ज्याचे रूपांतर होत असतें तें द्रव्य. 'उत्पादव्ययधोव्ययुक्तं स द्रव्यलक्षणम्' उत्पाद म्हणजे उत्पत्ति, धौव्य म्हणजे स्थिति व व्यय म्हणजे नाश असें उत्पत्तिस्थितिलय हे द्रव्याचे लक्षण आहे. 'जीवो उवगो गमओ अमुत्ति कत्ता सदेह परिमाणो । भुत्ता संसारत्थो सिद्धो सो विस्स सोढगई ॥' जीव, (आत्मतत्त्व ) चैतन्यस्वरूप, अदृश्य, कर्माचा स्वतंत्र कर्ता व भोक्ता, स्वदेहपरिमित, संसारी, मुक्त होण्यास लायक व नेहमी ऊध्वंगति असतो. 'सुखदुःखज्ञानं वा हितपरिकर्मचाहितभारुत्वम् । यस्य न विद्यते नित्यं तं श्रमणा वदन्त्यजीवम् ॥ सुखदुःखाचे ज्ञान किंवा हिताविषयी प्रवृत्ति व अहितापासून भीति जेथे कधीच संभवत नाही त्यास अजीव द्रव्य म्हणतात. यास पुद्रलहि म्हणतात. ' स्पर्शरस गन्धवर्णवन्तः पुद्गलाः' स्पर्श, रस, गंध व वर्ण ज्याला आहे ते पुद्गल द्रव्य होय. जीव व अजीव द्रव्यांना गमन करण्यास में सहाय्य करतें तें धर्म द्रव्य होय. त्याची व्याख्या अशी आहे. 'उदयं जहमच्छाणं गमणाणुग्गहयरं हवइलोए।
(७१)